विशाल पाटलांना काँग्रेसकडुन खासदारकीची उमेदवारी मिळणार नाही,हे विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांना माहीत होतं,त्यांनी ते ठरवून केले होते,असा गौप्यस्फोट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे,जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांना विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढतील याची कल्पना नव्हती,अपक्ष उभारल्यावर जयंत पाटील व विश्वजित कदम हे केवळ शरीराने तिकडं होते,असं विधान देखील गोपीचंद पडळकरांनी केले आहे,तसेच 2029 ला विशाल पाटील खासदार व्हावेत,अशी विश्वजीत कदम यांची तर इच्छा आहे का ? असा खोचक टोला लगावत,घोडं मैदान लांब नाही,आम्ही पण मैदानात असणारे,त्यावेळी बघू,असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे,नुकतंच विश्वजीत कदमांकडून 2029 ची लोकसभा काँग्रेस जिंकेल,असे विधान केले आहे,यावरून पडळकरांनी हा गौप्यस्फोट केला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.