Mahayti Goverment : शंभर दिवसांत महायुती सरकार स्थिर; पण बंगल्याच्या शोधत नऊ मंत्री अद्याप 'बेघर'

Mahayuti government 100 days : राज्य मंत्रीमंडळातीचा विस्तार होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. तरी अद्याप मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना शासकीय बंगले मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना फ्लॅटवर राहावे लागत आहे.
Mahayuti Goverment
Mahayuti GovermentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारच्या स्थापनेला 100 दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ नियुक्त्या आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावर चर्चा झाली असल्याचे समजते. राज्य मंत्रीमंडळातीचा विस्तार होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. तरी अद्याप मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना शासकीय बंगले मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना फ्लॅटवर राहावे लागत आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास 100 दिवसाचा कालावधी उलटला आहे. त्यानंतरही राज्य मंत्रीमंडळातील नऊ मंत्र्यांना बंगल्याविना इतरत्र राहावे लागत आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या शिवसेनेच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन तर भाजपच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे.

Mahayuti Goverment
Rahul Gandhi vs BJP : भाजपविरुद्धच्या संघर्षात काँग्रेसला उभं करण्यातच राहुल गांधींची कसोटी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) मंत्री असलेले फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सास्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार, यांच्यासह राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मकरंद पाटील व मेघना बोर्डीकर या नऊ मंत्र्यांना शासकीय बंगले मिळाले नाहीत.

Mahayuti Goverment
Amit Shah Raigad meeting : अमित शाहांच्या भेटीनंतरही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना! स्नेहभोजनानंतरही वाद कायम

त्यामुळे या राज्यमंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना कधी बंगले मिळणार या कडे सर्वांचे लागले आहे. चार महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली. ही निवडणूक पार पडल्यानंतर ५ डिसेबरला राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला.

Mahayuti Goverment
Amit Shah News : अण्णामलाईंना आधी गप्प केलं, नंतर कौतुक करावं लागलं; शहांची चाणक्यनीती फसली...

त्यानंतर मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. त्यामध्ये नऊ मंत्र्यांच्या वाट्याला बंगले आले नव्हते. त्यामुळे हे नऊ जणांना अद्याप बंगल्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे येत्या काळात बंगले नसलेल्या मंत्र्यांना कधी नवीन बंगले मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahayuti Goverment
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा अमित शाह, शिंदे भेटीनंतर खोचक टोला; म्हणाले.'काही लोक...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com