Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा अमित शाह, शिंदे भेटीनंतर खोचक टोला; म्हणाले.'काही लोक...'

Amit Shah Eknath Shinde meeting News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे या दोन्ही गटाच्या नेत्याच्या भेटीबाबत विचारणा केली असता त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेत उभी फुट पडल्यापासून उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आडवा विस्तवही जात नाहीत. दोघेही एकमेकावर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच गेल्या तीन दिवसापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेत नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे या दोन्ही गटाच्या नेत्याच्या भेटीबाबत विचारणा केली असता त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबईतील पाणी प्रश्नावर रविवारी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला. ‘काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील, आणि मग ते ज्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, आमच्या अनुभवावरून सांगतो. बाकी काही नाही.’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
BJP Maharashtra : भाजपमध्ये जबरदस्त कोल्ड वॉर! मुनगंटीवारांना पुन्हा जड जातोय त्यांचाच पठ्ठ्या, सुरू झाला वादाचा नवा अंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची भेट एकनाथ शिंदेंनी घेतली. मात्र त्यांनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केली. अर्थ खाते आमच्या फाईलवर सही करत नाही, अशी तक्रार त्यांनी शाह यांच्याकडे केली, तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा देखील त्यांनी या भेटीवेळी उपस्थित केला अशी माहिती समोर येत आहे.

Aditya Thackeray
Devendra Fadnavis: CM फडणवीसांची मोठी खेळी, एकेकाळी प्रशासन हादरवणारा 'हा' धडाकेबाज अधिकारी पुन्हा टीममध्ये दाखल होणार?

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेतील सर्वांची बैठक आज पार पडली. एकंदर आपण पाहात आहात गेल्या सहा-सात महिन्यांपासून मुंबईतील पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला आहे, मग कुठं गढूळ पाणी असेल, कुठं पाण्याचा दाब कमी असेल. आणि आता उन्हाळ्यात टँकर असोसियशनने संप पुकारला आहे. आता मुद्दा हा आहे की संपापूर्वी टँकर असोसियशनने नोटीस देऊन सुद्धा सरकार काही हलत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Aditya Thackeray
Sharad Pawar and ajit pawar News : साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड! शरद पवार अन् अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक; नेमके कारण आले समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com