Sharad Pawar Politics : शरद पवारांची मोठी खेळी; राजेंद्र शिंगणेंना घरातूनच आव्हान देण्याची तयारी; पुतणी उतरणार मैदानात

Sindkhedraja Assembly Election : शरद पवार यांना मी आतापर्यंत दोन वेळा भेटले आहे, त्यांच्याकडून मला विधानसभा निवडणुकीसाठी पॉझिटिव्ह संदेश आलेला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघात शिंगणे विरुद्ध शिंगणे अशी लढाई होऊ शकते.
Gayatri Shingane-Dr. Rajendra Shingane
Gayatri Shingne-Dr. Rajendra Shingne Sarkarnama
Published on
Updated on

Buldana, 06 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणखी एक मोठी खेळी खेळली असून डॉ. शिंगणे यांना घरातूनच आव्हान देण्याची तयारी चालवली आहे.

डॉ. शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांना पाठबळ देत विधानसभा निवडणुकीत आमदार शिंगणे यांना आव्हान देण्याचा डाव पवारांनी टाकला आहे. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शिंगणे विरुद्ध शिंगणे अशी लढाई पाहायला मिळू शकते.

डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingne ) हे एक सिंदखेडराजा मतदारसंघातून गेल्या 25 वर्षांपासून निवडून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे मंत्रिपदावरही काम केले आहे. मात्र, त्या तुलनेत विकास कामे झाली नसल्याचा आरोप शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे (Gayatri Shingne) यांनी केला आहे. तसेच, मतदारसंघातील साखर कारखाना आणि सूत गिरणीही बंद पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटात गेले. त्यामुळे शरद पवार गटाला गायत्री शिंगणे यांच्या रूपाने नेतृत्वासाठी एक तरुण चेहरा मिळाला आहे आणि त्या चेहऱ्याला आता पाठबळ देण्याचे धोरण शरद पवार गटाने हाती घेतले आहे, त्यातूनच शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष असलेल्या गायत्री शिंगणे यांनी आपल्या काकांच्या विरोधात विधानसभेसाठी रणशिंग पुंकण्याची तयारी चालवली आहे.

Gayatri Shingane-Dr. Rajendra Shingane
Mahayuti Meeting : विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; उदय सामंतांच्या बंगल्यावर ठरणार महायुतीची निवडणूक रणनीती

विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे म्हणाल्या, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मी आतापर्यंत दोन वेळा भेटले आहे, त्यांच्याकडून मला विधानसभा निवडणुकीसाठी पॉझिटिव्ह संदेश आलेला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघात शिंगणे विरुद्ध शिंगणे अशी लढाई होऊ शकते.

सिंदखेडराजा मतदारसंघातील लोकांनाही आता नवा चेहरा आणि नवीन नेतृत्व हवे आहे. मतदारसंघातील 50 ते 60 टक्के जनता माझ्या पाठीशी आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून आपल्याला शंभर टक्के विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, असेही गायत्री शिंगणे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Gayatri Shingane-Dr. Rajendra Shingane
Assembly Election Strategy : फडणवीस ॲक्शन मोडवर; मुंबई-ठाण्यातील आमदारांसोबतच्या चर्चेतून ठरणार निवडणूक स्ट्रॅटेजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com