Ajit Pawar News: अजितदादांची बारामतीत 'पॉवरफुल' खेळी, जय पवारांची राजकारणातली 'एन्ट्री' ठरली ? नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट?

Baramati Nagar Parishad Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे महानगरपालिका,जिल्हा परिषदा,पंचायत समितींच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे.
Ajit pawar Baramati
Ajit pawar Baramati Sarkarnama
Published on
Updated on

Baramati News: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावेळी प्रचंड गाजली. यापूर्वी कधीही माळेगावच्या कारखान्याची निवडणूक न लढवलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी स्वतः चा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामागं त्यांची मोठी रणनीती होती. आता माळेगावनंतर अजितदादांनी बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी पुन्हा तोच पॅटर्न वापरण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता अजितदादांनी स्थानिकसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातही तब्बल 9 वर्षांनी होत असलेली बारामती नगरपरिषदेची निवडणूकही अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत पवार कुटुंबातच थेट लढत झाली होती. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या. तर विधानसभेला अजित पवारांविरोधात शरद पवारांनी नातू युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत अजितदादांनी सुनेत्रा पवारांना अचानक मैदानात उतरवत धक्कातंत्र वापरलं होतं.

आता बारामतीत (Baramati) पुन्हा एकदा अजित पवार धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवसरात्र काम करताना जय पवार दिसून आले होते. त्याचवेळी पार्थनंतर आता अजितदादांच्या दुसर्‍या चिरंजीवांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा जोर धरू लागली होती. पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांचं नाव पुढं आणण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

Ajit pawar Baramati
NCP News: रुपाली ठोंबरेंकडून चाकणकरांना संपवण्याची भाषा! नेमका काय आहे वाद

बारामती नगरपरिषदेकडे सध्या पुणे जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून गणना होते. बारामतीतून नगरपरिषदेसाठी नवीन रचनेनुसार सर्वाधिक म्हणजे 41 नगरसेवक निवडून जाणार आहेत. आता हे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्यानं या पदावर कोणीही दावा करु शकणार आहे. याचमुळे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेंच सुरू आहे. अनेकजण फिल्डिंग लावून तयार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बारामतीच्या नगराध्यक्षपदावरुन रुसवे-फुगवे वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं यावेळी नगराध्यक्षपदासाठी मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. तोच संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांचं नाव अचानकपणे पुढे आणले जाऊ शकते,अशी चर्चा बारामतीच्या राजकारणात जोर धरु लागली आहे.

Ajit pawar Baramati
Uddhav Thackeray: आशिष शेलारांनी खरंच फडणवीसांना पप्पू म्हटलं? उद्धव ठाकरेंनी मानले आभार

जर अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनाच बारामतीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं तर आपसूकच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांमधील हेवेदावे संपले जाऊ शकतात असं समीकरण यापाठीमागं सांगितलं जात आहे. पण आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जून महिन्यात पार पडलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी आपली उमेदवारी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या निवडणुकीत स्वतः अजित पवार उमेदवार असल्यानं त्यांच्याकडे बघून पॅनल टू पॅनल मतदान झालं, क्रॉस वोटिंग टाळलं गेलं. आणि याचमुळे अजितदादांच्या पॅनलला माळेगाव कारखान्यावर पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता आणण्यात यश आलं. हाच पॅटर्न आता अजित पवार हे तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वापरणार की नवा पर्याय शोधणार याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com