Solapur News : ...अन्‌ देवेंद्र फडणवीस ओरडले, ‘ये...पाणी आणा रे कुणीतरी....’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता. २५ मे) सोलापूरच्या दौऱ्यावर होते.
Devendra Fadnavis-Vilas shah
Devendra Fadnavis-Vilas shahSarkarnama

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुसज्ज अशा जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. पहिल्या मजल्यावरील संविधानाच्या प्रास्तविकाचे अनावरण करून उपमुख्यमंत्री आमदार-खासदारांसह दुसऱ्या मजल्यावर गेले. त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले ज्येष्ठ प्राणीमित्र विलास शहा यांना भोवळ आली. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस ओरडले ‘ये...पाणी आणा रे कुणीतरी....’ पण, कुठेही लवकर पाणी मिळाले नाही. नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत अनेक सोयीसुविधा असल्या तरी पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पाहुण्यासाठी आणलेल्या बाटलीबंद पाणी देऊन शहा यांना स्थिरसावर करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची मात्र तारांबळ उडाली. (Animal friend Vilas Shah, who came to give a statement to Devendra Fadnavis, got dizzy)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गुरुवारी (ता. २५ मे) सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते महसूल भवनाचे उद्‌घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी विलास शहा हे वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते फडणवीस यांना भेटायला आले होते. सोलापूर-हैदाराबाद मार्गावरील कत्तलखान्यासंदर्भातील तक्रारीचे निवेदन घेऊन ते आले होते.

Devendra Fadnavis-Vilas shah
Bhagirath Bhalke News : पंढरपूर-मंगळवेढ्यातून विधानसभेची आरपारची लढाई लढणार : राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंची घोषणा

शहा यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन फडणवीसांना समस्या समजावून सांगत होते. फडणवीस यांच्याशी बोलत असतानाच विलास शहा थोडे खाली वाकले. त्यावेळी ते फडणवीसांच्या पाया पडत असावेत, असा अनेकांचा समज झाला. मात्र, विलास शहा जागेवरच कोसळल्याने त्यांना भोवळ आल्याचे सर्वांना समजले. यानंतर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

Devendra Fadnavis-Vilas shah
Daund Bazar Samiti: राहुल कुलांनी उलथवली राष्ट्रवादी सत्ता ; दौंड बाजार समितीवर प्रथमच भाजपचे वर्चस्व

फडणवीस यांनी विलास शहा यांना सावरण्याचा प्रयत्न केला. फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ताबडतोब विलास शहा यांना पाणी पाजून त्यांना खुर्चीवर स्थिस्थावर केले. आणि त्यांचे निवेदन स्वीकारले. सध्या शहा यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

फडणवीस आणि राधाकृष्ण विखे...

नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक निवेदने देण्यात आली. मात्र, कुणाचेही निवेदन त्यांनी नाकारले नाही. स्वत: उपमुख्यमंत्री फडणवीस सर्वांची निवेदने स्वत:च जमा करत होते. काही दिवसांपूर्वी याच इमारती शेजारील नियोजन भवनमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना कांदा उत्पादक शेतकरी निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्याएवजी जनहीत शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर भैय्या देशमुख यांना अनेक दिवस तुरुंगवास सहन करावा लागला होता.

Devendra Fadnavis-Vilas shah
Sangola APMC News: सांगोल्यात पुन्हा शेकापचा बोलबाला... सूतगिरणी, खरेदी-विक्रीसंघानंतर बाजार समितीवरही फडकावला झेंडा!

'तेवढा मोबदला तरी सूरत-चेन्नई प्रकल्पग्रस्तांना मिळावा'

यावेळी सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांची आढावा बैठक पूर्ण होताच आपले निवेदन दिले व गाऱ्हाणे घातले. त्यांच्या मागण्यांचे निवेदनही दिले. अनेक बैठका होऊनही आपल्याला न्याय मिळाला नाही. अक्कलकोट तालुक्यातील इतर मार्गांना मिळाला तेवढाही मोबदला सुरत-चेन्नई महामार्गासाठी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सुरत चेन्नई महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, सुरेखा होळीकट्टी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com