Balasaheb Thackeray Birth Anniversary : ...अन् बाळासाहेबांनी शरद पवारांसह भागीदारीत सुरू केलेला व्यवसाय गुंडाळावा लागला!

Balasaheb Thackeray Jayanti 2024 : बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्‍ट्राच्‍या राजकारणातील माइल स्‍टोन म्हणून ओळखले जातात.
Balasaheb Thackeray, Sharad Pawar:
Balasaheb Thackeray, Sharad Pawar:Sarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thackeray & Sharad Pawar : महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या नावाभोवती फिरतं, त्यांच्याशिवाय अपूर्ण समजलं जातं असे दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होय. राजकीय पक्ष, वाटचाल आणि विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या तरी या दोनही दिग्गज नेत्यांची मैत्री ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली. एरवी एकमेकांचे वाभाडे काढताना मागेपुढे न पाहणारे या नेत्यांनी मैत्रीत कधीच राजकारण आणले नाही. ते नेहमीच एकमेकांचा आदरच करत आले. राजकारण आणि मैत्री यापलीकडे यांच्यात आणखी एक नातं यांच्यात होते. पण ते अल्पावधीतच संपुष्टात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे त्यांच्या ठाकरे शैली, रोखठोक स्वभाव,बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. मराठी माणूस आणि हिंदुत्त्वाची कास धरत महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरेंनी आपला राजकीय दबदबा कायम ठेवला.गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात बाळासाहेबांचा नेहमीच विशेष आब राहिली.

Balasaheb Thackeray, Sharad Pawar:
Dr Ulhas Patil : निलंबनानंतर माजी खासदार डॉ.उल्हास पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'काँग्रेस सोडणार नव्हतो, पण...'

तसेच त्यांनी सुरुवातीपासूनच तळागळातल्या शिवसैनिकांप्रती जोडलेली नाळ जपताना कायमच पानटपरीवाला,भाजीपाला विक्रेता, रिक्षावाला अशा गर्दीतल्या लोकांना राजकीय चेहरा मिळवून दिला. त्यामुळे शिवसेना (Shivsena) अल्पावधीतच फक्त शहरांपुरती मर्यादित न राहता गावोगावांत पोहचली. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या पाठीमागे उभी केलेली ताकद शिवसेनेच्या वाढीसाठी नेहमीच पोषक ठरत गेली. उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ , कोकण अशा टप्प्यांत शिवसेनेनं बाळासाहेबांच्या करिष्म्यामुळे आपली पाळंमुळं घट्ट रोवली.

राजकारणावर जबरदस्त पकड मिळविलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषत: रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी राजकीय क्षेत्रात एन्ट्री करण्याआधी भागीदारीत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. व्यवसायात नशीब आजमावण्याच्या त्यांच्या निर्णयाची मोठी चर्चाही झाली होती. पण काही दिवसांतच हा व्यावसायिक भागीदारीचा निर्णय या दोन्ही नेत्यांनी गुंडाळला. आपण भलं आणि आपलं राजकारण भलं म्हणत त्यांनी पुन्हा कधीही व्यवसायात न उतरण्याच्या आणाभाका घेतल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार(Sharad Pawar) हे महाराष्‍ट्राच्‍या राजकारणातील माइल स्‍टोन म्हणून ओळखले जातात. दोन्हीही नेत्यांनी प्रचंड संघर्ष करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमार्फत महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.एकीकडे पवारांनी आपली राजकीय घौडदौड कायम ठेवतानाच व्यावसायिक पातळीवर सहकाराचं विस्तृत जाळंही राज्यात तयार केले. पण दुसरीकडे बाळासाहेब राजकारण एके राजकारण सुरू ठेवलं. पण या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचा उल्लेख ज्या ज्यावेळी होतो तेव्हा त्यांच्यातल्या पहिल्या वहिल्या व्यावसायिक भागीदारीचा किस्सा तितक्यात रंजकतेने मांडला जातो.

काय आहे किस्सा...?

या दोन्ही नेत्यांनी तरुणपणी एकत्र येत आंतराष्‍ट्रीय दर्जाचे मासिक सुरू केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी 1960 मध्ये 'फ्री प्रेस जर्नल' मधील व्‍यंगचित्रकाराची नोकरी सोडली. त्‍यानंतर त्‍यांनी पुन्हा कधी नोकरी केली नाही. त्याचकाळात शरद पवार, भा. कृ. देसाई आणि शशिशेखर वैद्यक या तीन तरुणांसोबत घेत त्‍यांनी एक आंतराष्‍ट्रीय दर्जाचे मासिक सुरू करण्‍याचा निर्णय घेतला. अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘टाइम’ मासिकाच्या तोडीचा त्‍याचा दर्जा असावा, असे या सगळ्यांचे एकमत झाले. चौघांनीही खूप विचार करून याचे नियोजन केले.

Balasaheb Thackeray, Sharad Pawar:
Sanjay Raut News: काळराम मंदिरात पूजा, गोदावरी आरती आणि बरंच काही | Uddhav Thackeray | Nashik

या चारही जणांनी खूप विचार या मासिकासंदर्भात तयारी केली. त्या मासिकाचे नाव 'राजनीती' ठेवले. याचवेळी आपल्यातली व्यवसायिकता दाखवत मालकी हक्काबाबतही निर्णयही घेतला. त्यात चौघांची मालकी समान राहील, असं ठरलं. पण हे मासिक सुरु करण्याआधी ते चालेल का अशी शंका त्यांच्या मनात येऊ लागली.

बहिणीचा कौल खरा ठरला...?

याचदरम्यान, मासिक चालणार की नाही हे जाणून घेण्यासाठी हे दोन्ही नेते बाळासाहेबांच्या एका बहिणीकडे गेले. त्यांच्या बहिणीच्या अंगात येत असत. आणि विशेष म्हणजे त्या सांगतील ते खरं होतं असंही बोललं जात होतं. 'राजनीती' या मासिकाची एकही प्रत बाजारात विकली जाणार नाही असं बाळासाहेबांच्या बहिणीने या दोन्ही नेत्यांना सांगितलं. पण, तरीदेखील या दोन्ही नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत मासिक काढलं. पण प्रत्यक्षात मासिक निघाल्यावर ते काही चाललंच नाही चाललंच नाही आणि शेवटी तो व्यवसाय गुंडाळून ठेवावा लागला.

Balasaheb Thackeray, Sharad Pawar:
Maratha Reservation : मोठी बातमी: जरांगे पाटील पुण्याच्या वेशीवर येणार अन् मुख्यमंत्री शिंदे उद्याच मोठा निर्णय घेणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com