Balasaheb Thackeray Jayanti : ...आणि बाळासाहेब ठाकरेंनी व्यासपीठावर बैठक मारली!

Balasaheb Thackeray : विरोधकांवर कंबरेखाली वार करण्यात त्यांनी कधीही मागे-पुढे पाहिले नाही. सार्वजनिक सभांमध्ये लोकलाजेस्तव जे बोलता येत नाही ते बाळासाहेब बिनधास्तपणे बोलत होते.
Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeraysarkarnma
Published on
Updated on

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्वाने महाराष्ट्राला गारुड घातले. तुम्ही बाळासाहेबांच्या भाषणाचे चाहते असाल किंवा विरोधक. बाळासाहेबांच्या भाषणाच्या चाहत्यांसाठी मधला मार्ग कधीच नव्हता. प्रश्न कुठलाही असो थेट भूमिका घेणे ही बाळासाहेबांची खासियत. त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांशी संवाद. भाषण करताना त्यांच्यातला व्यंगचित्रकार जागा होत असे. मग ते आपल्या भाषणातून शरद पवारांना 'मैद्याचं पोतं, भाजपला 'कमळाबाई,' छगन भुजबळांना 'लखोबा,' सोनिया गांधींना 'इटालियन' आणि दक्षिणात्यांचा 'यंडूगुंडू' म्हणून उल्लेख करीत. विरोधकांवर कंबरेखाली वार करण्यात त्यांनी कधीही मागे-पुढे पाहिले नाही. सार्वजनिक सभांमध्ये लोकलाजेस्तव जे बोलता येत नाही ते बाळासाहेब बिनधास्तपणे बोलत होते.

आपल्या भाषणात रोखठोक बोलणं, विरोधकांना कसपटासमान समजणं, त्यांच्या नकला करणं, खिल्ली उडवणं ही खास ठाकरे शैली होती. व्यासपीठावर जी कृती करायला बाकीचे राजकारणी घाबरत बाळासाहेब ते अगदी उत्स्फूर्तपणाने करत. मुंबई महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावरून आपल्या आग ओकणार्‍या भाषेत विरोधकांचा समाचार घेतला आणि पुढच्याच क्षणी त्याच व्यासपीठावर आडवे होऊन निवडून देणार्‍या जनतेला साष्टांग दंडवत घातला. शिवसेनेची पहिल्यांदा मुंबई महापालिकेत सत्ता आली त्यावेळेस महापालिका आयुक्त कांगो नावाचे आयएएस अधिकारी होते. तेव्हा बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) भरसभेमध्ये आपल्या नगरसेवकांना सांगितले. जर कांगो तुमचं ऐकत नसेल तर बिनधास्त त्याच्या कानाखाली जाळ काढा, पुढचे मी बघून घेईन.

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Birth Anniversary : ...अन् बाळासाहेबांनी शरद पवारांसह भागीदारीत सुरू केलेला व्यवसाय गुंडाळावा लागला!

1998 मध्ये लोकसभा निवडणुकीची सभा होती. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युती. त्यामुळे युतीची सभा गिरगाव चौपाटीवर होती. व्यासपीठावर गोपिनाथ मुंडे, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन होते. बाळासाहेब भाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी व्यासपीठाजवळ बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ सुरू झाला. बाळासाहेबांनी लोकांना शांत बसण्याची विनंती केली. मात्र, तरीही गोंधळ काही थांबला नाही. अचानक कोणीतरी पाठीमागे फटाके फोडले. त्यामुळे मागचे लोकही उठून उभे राहिले. तेव्हा बाळासाहेब काही न बोलता शांतपणे व्यासपीठावर दोन्ही पायांवर बसले. लोकांच्या हे लक्षात आले आणि त्याक्षणी गोंधळ संपला. बाळासाहेबांची बैठक बघून व्यासपीठावरील गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांना आपले हसू आवरता आले नाही. तर सभेतील लोकांनीदेखील टाळ्या वाजवत बाळासाहेबांच्या या मिश्किलपणाला दाद दिली.

बाळासाहेबांचे भाषण आणि हल्ला

बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे प्रचंड आक्रमकता असे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. त्या मेळाव्यात मराठी माणसाचे रोजगार दक्षिणात्य हिसकावत असल्याचा मुद्दा बाळासाहेबांनी मांडला. बाळासाहेबांची भाषा एवढी जहाल होती, की या मेळाव्यानंतर दक्षिणात्य हाॅटेलवर सभेला आलेल्या तरुणांनी हल्ले केले.

शिवसैनिक मर्द...

मला लोकशाही मंजूर नाही. मला ठोकशाही मंजूर आहे. मला मर्दांची सेना हवी आहे. असे आपल्या जाहीर सभांमध्ये बोलून बाळासाहेब सभेतील तरुणांच्या पौरुषत्वाला आव्हान देत. इतिहासातील काही महापुरुषांचा 'षंढ' म्हणून उल्लेख करण्यातदेखील बाळासाहेबांनी मागे-पुढे पाहिले नाही.

हातात कधी कागद घेतला नाही

बाळासाहेबांनी सलग 46 वर्षे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. लाखोंच्या संख्येत जमणाऱ्या जनसमुदायासमोर त्यांनी कधीही आपले भाषण वाचून दाखवले नाही अथवा हातात कागद घेत टिप्पण पाहून भाषण केले नाही. त्यांचे भाषण म्हणजे उत्स्फूर्त संवाद. चालू राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांचे वाभाडे ते काढत. विचार सूचतील तसे ते बोलत जात. भाषणात एखाद्याचे नाव नाही आठवले तर व्यासपीठावरून आपल्या सहकाऱ्यांना विचारत की, तो कोण रे दिल्लीतून बरळत होता.

बाळासाहेब दसरा मेळाव्याला आले नाहीत...

शिवसेना, दसरा मेळावा आणि बाळासाहेबांचे भाषण हे ठरलेलं समीकरण. मात्र, हे 2012 मध्ये तुटले. बाळासाहेब आजारी असल्यामुळे 2012 च्या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हिडीओद्वारे आपला संदेश दिला. मी थकलोय, मला बोलताना ही धाप लागतेय. मी 45 वर्षे शिवसेना सांभाळली. मी आता 86 वर्षांचा आहे. तुम्हाला सांभाळलं. आता उद्धव,आदित्यला सांभाळा. मी घराणेशाही लादली नाही तुम्ही त्यांना स्वीकारलं. आता तुम्हीच सांभाळून घ्या, असा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून बाळासाहेबांनी दिला. बाळासाहेबांचा थकलेला आवाज ऐकूम शिवसैनिक भावुक झाले होते.

R...

Balasaheb Thackeray
Bal Thackeray Birth Anniversary: भुईमुगाच्या शेंगा अन् 'दोराबजी'बिर्याणीवर बाळासाहेब ताव मारायचे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com