Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Sarkarnama

Koshyari's Controversial Statements : ‘या’ विधानांमुळे कोश्यारी ठरले महाराष्ट्राचे सर्वाधिक वाद॒ग्रस्त राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी आपल्या कामापेक्षा वाद्‌ग्रस्त विधानांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिले.
Published on

मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहिलेले राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची केंद्र सरकारकडून अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (ता. १२ फेब्रुवारी) अखेर मंजूर केला आहे. पाच सप्टेंबर २०१९ रोजी राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतलेले कोश्यारी हे महाराष्ट्राचे सर्वाधिक वादग्रस्त राज्यपाल ठरले आहेत. (Bhagat Singh Koshyari became the most controversial Governor of Maharashtra)

भगतसिंह कोश्यारी यांची ३१ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांनी आपल्या पद्‌भार स्वीकारला होता. त्यांना ३ वर्षे पाच महिने एवढा कालावधी मिळाला. पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच उचलबांगडी होणारे ते राज्याचे पहिले राज्यपाल ठरले आहेत. ते आपल्या कामापेक्षा वाद्‌ग्रस्त विधानांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिले.

Bhagat Singh Koshyari
Pawar On Koshyari Resign : ‘महाराष्ट्राची सुटका झाली...’ : कोश्यारींच्या राजीनाम्यावर शरद पवारांचे भाष्य

समर्थ नसते शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते?

समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे विधान औरंगाबादमधील एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी केले होते. भारतात अनेक सम्राट आणि महाराज जन्माला आले. पण, चाणक्य नसता तर चंद्रगुप्ताला कोणी विचारले असते. समर्थ (रामदास) नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते?, असे वादग्रस्त विधान कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, 'हे' असणार नवीन राज्यपाल

...तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही

राज्यातील गुजराती आणि राजस्थानी (मारवाडी) माणसाला मुंबईतून बाहेर काढले, तर मुंबईत पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान कोश्यारी यांनी केले हेाते. त्यावेळी महाराष्ट्रात मोठे वादंग उभे राहिले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘कोश्यारी यांना चप्पल दाखवण्याची वेळ आली आहे,’ अशी खरमरीत टीका केली होती.

Bhagat Singh Koshyari
Ramesh Bais : कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैंस ; जाणून घ्या सविस्तर..

शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श

मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात बोलताना त्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांच्यासारखे व्यक्तीमत्व आधुनिक राज्याचे प्रतीक आहेत. शालेय जीवनात आदर्श शिक्षकाने आदर्श नेत्याचे नाव विचारले तर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांची नावे घेतील. पण, आता राज्याबाहेर जाण्याची गरज नाही.

Bhagat Singh Koshyari
Konkan News : गुहागरमध्ये मला पाडण्याचा आदेश ‘मातोश्री’तूनच देण्यात आला : रामदास कदमांचा ठाकरेंवर गंभीर आरोप

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधान

पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा बालविवाह झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, वयाच्या १० व्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न १३ वर्षांचे असलेले जोतिराव फुले यांच्याशी झाले. आता विचार करा, खेळण्या बागडण्याच्या वयात लग्नानंतर मुलगा आणि मुलगी काय करत असतील? ते काय विचार करत असतील?

उद्धव ठाकरेंचे खरमरीत पत्र

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली मंदिरे उघडण्यासंदर्भात कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोश्यारी यांची बिनपाण्याने केली होती. ते पत्र राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजले होते. याशिवाय महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या ११ अमदारांची नियुक्ती त्यांनी अखेरपर्यंतर रखडवून ठेवली. तसेच, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या बहुमतासाठी बोलविण्यात आलेल्या अधिवेशनासंदर्भातही तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com