Kolhapur Lok Sabha Result : आम्हाला गृहीत धरू नका! कार्यकर्त्यांना नेत्यांना इशारा; कोल्हापूर लोकसभेत नेमकं काय घडलं?

Kolhapur Politics : ऐनवेळी नेत्यांनी एक पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्याने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची पंचायत झाली. यातून कार्यकर्त्यांनी संबंधित नेत्यांना फाट्यावर मारण्यासह त्यांच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवली.
Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha Constituency Sarkarnama

Kolhapur Political News : लोकसभेच्या निकालानंतर कोणाचा राजकीय गेम झाला? कोणाचा काटा काढला? आगामी राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून कोणी कोणाला मदत केली? अशा अनेक चर्चा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहेत. जिथे अपेक्षित होतं तिथं तसं घडलं नाही. आणि जिथे घडलं तिथं अपेक्षित नव्हतं. असेच चित्र सध्या महायुतीच्या गोठात आहे.

सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची फरपट होणाऱ्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर कार्यकर्तेही नेत्यांना फाट्यावर मारू शकतात, असा इशारा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांना दिला आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या अधिकच्या मताधिक्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांनीच नेत्यांना जुमानले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेत्यांच्या मागेमागे फिरणाऱ्या कार्यकत्यांनी नेत्यांनाच 'कात्रजचा घाट' दाखविल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

राज्यातील सत्ता बदलाच्या खेळात राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच सर्वच पक्ष लोकसभेला सामोरे गेले आहेत. सत्तेसाठी फोडाफोडीच्या राजकारणात आणि कार्यकर्त्यांची नाहक बळी गेल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्याची खदखद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्ते एकीकडे आणि नेते एकीकडे असेच चित्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले. त्यातूनच महायुतीतील काही नेत्यांनी कार्यकर्त्यापर्यंत निरोप पोहोचवले नसल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

राज्यातील सत्ता बदलाच्या खेळानंतर जिल्ह्यातील राजकारणाचे समीकरणे बदलले गेले. राष्ट्रवादीत दोन गट आणि शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्याने तालुक्यात दोन गट पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर राष्ट्रवादीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील,माजी आमदार के.पी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Kolhapur Lok Sabha Constituency
Ravindra Waikar Vs Amol Kirtikar : वायकरांनी मॅच जिंकली; पण 'मॅन ऑफ दी मॅच'चे मानकरी कीर्तीकर!

एकीकडे मागील राजकीय इतिहास पाहता आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या नेत्यांनी एकमेकांना पाण्यात पाहिले त्याच नेत्यांना आता गळ्यात गळे घालण्याची वेळ या लोकसभेच्या निमित्ताने आली होती. शिवाय मागील लोकसभा निवडणुकीत खासदार संजय मंडलिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना एकमेकांच्या विरोधात लढण्याची वेळ आली होती. त्याच महाडिक यांना खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करावा लागणार होता.

महायुतीतील नेते एकत्र आल्याने हा सगळा घोळ कार्यकर्त्यांना पचलेला दिसत नाही. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये हीच परिस्थिती आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समर्जित घाटगे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राजेश पाटील आणि भाजपचे नेते शिवाजी पाटील राजकीय विरोधक आहेत.

राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के पी पाटील हे प्रतिस्पर्धी आहेत. अशावेळी लोकसभा निवडणूक निमित्ताने महायुतीतील नेते एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांची चांगलीच घालमेल वाढली होती. कोल्हापूर लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

काही नेत्यांच्या जवळचे समजले जाणारे आणि लोकांत चांगली प्रतिमा असणारे कार्यकर्तेही प्रचारात दिसले नाहीत. प्रमुख नेते प्रचारात दिसले पण तेही भाषणापुरतेच त्यानंतरचा त्यांचा वावरही संशयास्पदच होता. शिवाय तळागाळापर्यंत निरोप पोहोचवण्याची जबाबदारी ज्या त्या नेत्यांची होती. मात्र ऐनवेळी याच नेत्यांनी कार्यकर्त्यांपासून हात वर केल्याचे दिसून येते.

आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच विरोधात लढावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांची मने सांभाळण्याचे काम या नेत्यांनी केले आहे. भाषणासाठी व्यासपीठावर उपस्थित राहून राज्य पातळीवर नेत्यांची मने राखण्याचं काम माहितीतील नेत्यांनी केला आहे. तर कोणतेही बंधन न ठेवून कार्यकर्त्यांनाही आपल्यासोबत ठेवण्याचे काम महायुतीतील काही नेत्यांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Kolhapur Lok Sabha Constituency
Harshvardhan Jadhav News : 'माझी लायकी दाखवून दिलीत', चांगलं झालं.. हर्षवर्धन जाधव झाले उद्विग्न !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com