BJP News : भाजपचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच पहिली यादी ? राष्ट्रवादी, सेनेला देणार मोठा धक्का

BJP Political News : लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप उमेदवारांची पाहिली यादी जाहीर करण्याचा भाजपचा प्लॅन आहे.
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील हालचाली वाढल्या आहेत. सर्वच पक्षांनी दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आतापासूनच बैठकांवर जोर दिला जात आहे.

महायुतीच्या समन्वय समितीची बैठक दोन दिवसापूर्वीच पार पडली. यामध्ये सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

त्यानंतर भाजप हायकमांडच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप उमेदवारांची पाहिली यादी जाहीर करण्याचा भाजपचा प्लॅन आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने (Bjp) जवळपास देशभरातील १९५ जणांच्या पहिल्या यादीची घोषणा निवडणूक जाहीर होंण्यापूर्वीच घोषित करीत आघाडी घेतली होती. १७ मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली होती.

त्यापूर्वी २ मार्चला भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. त्याचा फायदा या उमेदवारांना झाला होता. प्रचारासाठी जादा वेळ मिळाल्याने या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे भाजपने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती. तर 13 मार्चला घोषित करण्यात आलेल्या उमेदवाराच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश होता.

आता महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यापूर्वीच भाजप हायकमांडकडून हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभेच्या धर्तीवरच विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वीच महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यासाठीची भाजपची रणनीती ठरली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत 30 ते 35 उमेदवाराचा समावेश असणार असल्याची माहिती आहे.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Ajit Pawar News : नागरिकांना काम करणारे सरकार हवे; अजित पवारांची विरोधकांवर टीका

महाराष्ट्रासह येत्या काळात निवडणूक होत असेलल्या हरियाणा राज्यातील उमेदवारांचीही पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी जादा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरच उमेदवार जाहीर करण्याची भाजपची रणनीती असणार आहे.

महाराष्ट्रातील महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जागावाटपाची चर्चा सुरु आहे. हे जागावाटप लवकरच पूर्ण करून भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील 30 ते 35 उमेदवाराचा समावेश करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आता सर्वांचेच या यादीकडे लक्ष लागले आहे.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Ashok Chavan News : `हवा बहोत तेज चल रहा है`, अशोकराव...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com