Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Chandrakant Patil : खडसेंबरोबरच जळगावला केंद्रात आणखी एक मंत्रिपद; चंद्रकांत पाटलांच्या निष्ठेला मोदींकडून न्याय!

Modi Government 3.0 : पाटील हे गुजरातमध्ये गेले असले तरी त्यांचा महाराष्ट्राशी संबंध कायम आहे. त्याचे बरेचसे नातेवाईक हे महाराष्ट्रातील खानदेशात आहेत. विशेषतः जळगावमध्ये त्यांचे कायम जाणे येणे असते.

Solapur, 10 June : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबरोबर खानदेशाला केंद्रात आणखी एक मंत्रिपद मिळाले आहे. होय, हे खरंय. कारण मूळचे जळगाव जिल्ह्यातील मात्र सध्या भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोदी सरकार ३.० मध्ये मंत्रिपदी वर्णी लागली आहे. केशूभाई पटेल यांच्यासोबतच्या राजकीय संघर्षात कायम मोदींची पाठराखण करणाऱ्या पाटील यांना निष्ठेचे फळ मिळाले आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ऊर्फ सी. आर. पाटील यांचा जन्म हा जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पिंपरी आक्राऊट या गावी झाला. पुढे हे कुटुंबीय गुजरातला स्थलांतरित झाले. चंद्रकांत पाटील यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत १९८९ मध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. गुजरातचे ज्येष्ठ भाजप नेते केशुभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांच्यातील वादात चंद्रकांत पाटील हे कायम मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढे २००९ मध्ये नवसारीमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांनी यश मिळविले. त्यानंतरच्या २०१४ च्या मोदी लाटेत सी. आर. पाटील हे देशातील तीन नंबरच्या मताधिक्क्याने म्हणजेच ५ लाख ५८ हजार पेक्षा जास्त मताधिक्यांनी त्यांनी विरोधकांना मात दिली होती. पुढील २०१९ च्या निवडणुकीत तर त्यांना विक्रमी ९ लाख ७२ हजार ७३९ मते मिळाली होती, ते ६ लाख ८९ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. मोदी आणि अमित शाह यांच्यापेक्षाही सीआर पाटील यांना जास्त मते मिळाली होती.

चंद्रकांत पाटील यांना २०२४ च्या निवडणुकीत १० लाख ३१ हजार ०६५ मते मिळाली असून ते तब्ब्ल ७ लाख ७३ हजार ५५१ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. पाटील हे २००९ पासून चढत्या मताधिक्क्याने विजयी होत आहेत. सीआर पाटील यांच्याकडे जुलै २०२० पासून गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीही जबबादारी आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातच भाजपने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती मोदी-शहांकडून पाटील यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.

Chandrakant Patil
Rajendra Raut : ‘रवींद्र गायकवाडांना ५५ हजारांचे लीड दिलं; पण विधानसभेला माझा पराभव झाला होता’

पाटील हे गुजरातमध्ये गेले असले तरी त्यांचा महाराष्ट्राशी संबंध कायम आहे. त्याचे बरेचसे नातेवाईक हे महाराष्ट्रातील खानदेशात आहेत. विशेषतः जळगावमध्ये त्यांचे कायम जाणे येणे असते. त्यांची कन्या भाविनी पाटील यांचा विवाह जळगावच्या मोहाडी गावातील रामभाऊ पाटील यांच्याशी झाला आहे. भाविनी यांनी मोहाडी ग्रामपंचायतीची निवडणूकही लढवली होती.

त्यांची दुसरी कन्या धरती निखिल देवरे यांची जानेवारी २०२४ मध्ये धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे पाटील जरी गुजरात भाजपची धुरा संभाळत असले तरी त्यांच्या कन्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. पाटील यांच्या भाजपमधील दबदब्याचा त्यांच्या कन्यांना महाराष्ट्रात नक्कीच फायदा होतो.

पाटील यांचा सुरतमध्ये छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्रीयन विकास मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, रेणुका माता ट्रस्ट आदी विविध संस्था, संघटनांशी निकटचा संबध आहे.

Chandrakant Patil
Raksha Khadse: 'मी रक्षा निखिल खडसे...'; पहिल्यांदाच घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com