Shivaji Maharaj Statue Collapsed : चुकीला माफी नाही !

Chhatrapati Shavaji maharaj statue Collapsed : छत्रपती शिवराय हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्याबाबत इतका हलगर्जीपणा करणाऱ्या या सरकारला शिवप्रेमी जनता माफी देणार नाही.
Chhatrapati Shavaji maharaj statue Collapes
Chhatrapati Shavaji maharaj statue Collapsed Sarkarnama
Published on
Updated on

अ‍ॅड. हर्षल प्रधान

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : महाराष्ट्रात पहिल्यांदाच अघटित घडले आहे. महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा आदर्श आजही गडकिल्यांच्या रूपाने महाराष्ट्र दिमाखाने जगाला दाखवतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले ऊन - वारा - पाऊस आणि वादळांचा सामना करत आजही शेकडो वर्षानंतरही दिमाखाने उभे आहेत. मात्र महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुती सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने उभारलेला सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही महाराष्ट्रासाठी अतिशय लांछनास्पद अघटित घटना आहे. आता याबाबत पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे माफी मागत आहेत. मात्र या चुकीला माफी नाही. छत्रपती शिवराय हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्याबाबत इतका हलगर्जीपणा करणाऱ्या या सरकारला शिवप्रेमी जनता माफी देणार नाही.

राज्यात महायुतीचा घटनाबाह्य सरकार गेली दोन अडीच वर्ष सत्तेत आहे. एकमेकांचे राजकीय विरोधक असणारे केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी सत्तेत बसून दिल्लीतील भाजपा शेटजीच्या तालावर नाचून महाराष्ट्रातील सगळ्या मौल्यवान चिजा ओरबाडून आपल्या राज्यात पळवत आहेत. भाजपाचे १०५ आमदार निवडून येऊनही भाजपच्या हाती पूर्ण सत्ता आली नाही. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यामुळे पाच वर्ष त्यांनी स्वत:च्या पक्षाची आणि नेतृत्वाची महाराष्ट्रात ससेहोलपट करून घेतली.

मोदी शाह यांनी साम दाम दंड भेद सगळं करून पाहिले मात्र महाराष्ट्रातील जनता एकनिष्ठ असल्याने जनतेने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. उद्धव ठाकरे यांनी पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीत स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत शासनकर्ता कसा असावा त्याचंउत्कृष्ट उदाहरण या देशातील राजकारण्यांना दाखवून दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांना कुटुंबप्रमुख म्हणून स्वीकारले. उद्धव ठाकरे यांची वाढती लोकप्रियता भाजपाच्या शेठजींना डोळ्यात खुपली आणि त्यांचा राजकीय घात करून एकनाथ शिंदे आणि इतर चाळीस आमदारांना ईडी आयटी सीबीआयची भीती दाखवून त्यांच्यापासून वेगळे करून त्यांची सत्ता त्यांनी ओरबाडली.

Chhatrapati Shavaji maharaj statue Collapes
Kolkata Rape-Murder Case : भाजप पहिल्यांदाच देणार ममतांना पाठिंबा; आज विशेष अधिवेशनात ऐतिहासिक विधेयक...

भाजपा सत्तेच्या उन्मादाच्यासर्व सीमा पार करून उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष , चिन्ह आणि पक्षाचं सर्वस्व ओरबाडून एकनाथ शिंदे यांच्या हातात देऊन त्यांना मुख्यमंत्री बनवून महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडले नव्हते असे गलिच्छ राजकारण करून बसला. त्यावरही त्यांचे पोट भरले नाही म्हणून तीच खेळी त्यांनी शरद पवार यांच्या बाबतही खेळली आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांनाही पक्ष, चिन्ह आणि पक्षाचे सर्वस्व गमवावे लागले. महाराष्ट्रातील जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत होती आणि त्याचाच परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिला आणि ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) निवडून दिले आणि भाजपाला आपल्या कर्माची फळे भोगायला लावली. मात्र यानंतरही भाजपा शेठजीचे डोळे उघडले नाहीत. त्यांनी देशात पुन्हा आंध्र आणि बिहार मधील त्याचं राजकीय उलटापालथी करून आणि त्याचं ईडी सीबीआय आयटी अस्त्रचा वापर करून कसेबसे बहुमताचे गणित जुळवले आणि पुन्हा सत्तेत आल्यावर तेच राजकीय खेळ खेळू लागले. महाराष्ट्रात सत्ता पालट होण्याची कुणकुण लागल्यामुळे त्यांनी महापालिकेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकाही लांबणीवर टाकण्याचा घाट घातला आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या भ्रष्ट कारभाराला खुलेआम परवानगी देऊ केली.

Chhatrapati Shavaji maharaj statue Collapes
Tanaji Sawant : हुजूर सरकार! डेंग्यूमुळे दोन कोवळे जीव गेले, आरोग्यमंत्री राजकीय कुरघोड्यांत दंग राहिले

बिचारे भाजपा आणि संघांचे कार्यकर्ते हे अगतिक राजकारण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत बसले आणि एका मागोमाग एक आपल्याच पक्षांच्या नेत्यांच्या चुका मोजत बसले. त्यातच ही महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना घडली आणि जगात महाराष्ट्राचे नाव धुळीस मिळाले. आता त्यावर पंतप्रधान मुख्यमंत्री माफीनामा सादर करून आपल्या चुका पाठीशी घालू पाहत आहेत. मात्र या चुकीला कधीच माफी मिळू शकत नाही. खरेतर पंतप्रधान महोदयांनी या चुकीबद्दल जे जे जबाबदार असतील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून तो घ्यायला हवा होता मात्र केवळ भ्रष्ट राजकारण्यांना आपल्या कळपात घेऊन महाराष्ट्र ओरबडण्याची मनोवृत्ती असणाऱ्यांकडून वेगळी कोणती अपेक्षा करणे चुकीचे आहे. महाराष्ट्राची जनता ह्या चुकीबद्दल यांना कधीही माफ करणार नाही .

पंतप्रधान इतक्या वेळा महाराष्ट्रात आले पण केवळ राजकारण करून गेले

गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी असंख्या वेळा महाराष्ट्रात येऊन गेले. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी राजकारण केले. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्रातील आर्थिक शासकीय कार्यालये, रत्न बाजारासारखे उद्योग पळवले. मात्र एवढे करूनही महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित असणारे निकाल आले नाही. याला कारणीभूत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांची हापपले पणाचे राजकारण हेच कारण होते. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर सातत्याने आले. अगदी गेल्या दहा वर्षातील त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची उजळणी केली तर सहज लक्षात येते की त्यांचे हे दौरे राजकीय स्वार्था पोटीच होते. पंतप्रधान २१ जुलै २०१४ BARC येथे मोदींची भेट, २१ ऑगस्ट २०१४ नागपूर मेट्रो भूमिपुजन, मुंबई दौरा २५ ऑक्टोबर २०१४ सर एच एन रूग्णालयात भेट, नविन राज्य सरकार शपथविधी ३१ ऑक्टोबर २०१४,

पंतप्रधान मोदी २ आणि ३ जानेवारी २०१५ मुंबई, कोल्हापूर, पुणे डिजिटल विलेज लोकार्पण, ICICI ६० वर्षे पूर्ण बिकेसी. सय्यदाना मुफद्दल सैफुद्दीन दाऊदी बोहरा समुदायाची राजभवन येथे भेट, ३ जानेवारी भारतीय विज्ञान काँग्रेस १०२ वे उद्घाटन मुंबई विद्यापीठ, पुढारी प्रकाशन ७५ वर्ष कार्यक्रम उपस्थिती, १८ जानेवारी २०१५ पंतप्रधान शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती., १४ फेब्रुवारी २०१५ चाकण एमायडीसी दुसरा टप्पा उद्घाटन, बारामतीत विद्या प्रतिष्ठान कार्यक्रम उपस्थिती, अप्पासाहेब पवार केंद्राचे उद्घाटन, कृषी विज्ञान केंद्र भेट, शरद पवार निवास्थान गोविंदबाग येथे भोजन, मुंबई उच्च न्यायालय संग्राहलय उद्घाटन, वरळी स्पोर्टस् सेंटर येथील सरदार वल्लभभाई पुतळ्याला अभिवादन, २ एप्रिल मुंबई आरबीआय परिषद उपस्थिती, ११ ऑक्टोबर २०१५ जेएनपीटी चौथा टर्मिनल भूमिपुजन, चैत्यभूमी दर्शन, इंदू मिल भूमीपूजन दोन मेट्रो प्रकल्प भूमीपुजन, १३ फेब्रुवारी २०१६ मुंबई कला केंद्र दौरा, मेक इन इंडिया सेंटर उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून स्नेहभोजन, १४ एप्रिल २०१६ मेरीटाईम परिषद उद्घाटन, २५ जून २०१६ स्मार्ट सिटी मिशन आणि अमृत लोकार्पण प्रथम वर्धापनदिन पुणे दौरा , २४ डिसेंबर २०१६ मुंबई दौरापाताळगंगा उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमिपुजन.

Chhatrapati Shavaji maharaj statue Collapes
Raosaheb Danve : रावसाहेब दानवे भाजपला 2019 मधील ‘ते’ करिश्माई यश विधानसभेला मिळवून देणार?

दोन मेट्रो स्टेशन भूमिपुजन पुणे मेट्रो पहिला टप्पा भूमिपुजन, १४ एप्रिल २०१७ नागपूर दौरा, दीक्षाभूमी १२४ जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोराडी थर्मल पॉवर उद्घाटन, सरकारी योजना लोकार्पण, डिजीधन मेळा दीक्षाभूमी पोस्टल स्टॅम्प प्रकाशन, जाहीर सभा, १८ फेब्रुवारी २०१८ नवी मुंबई विमानतळ , जेएनपीटी लोकार्पण, मॅग्नेटिक महाराष्ट्र उद्घाटन, वाधवानी संस्था, २६ जून २०१८ (मुंबई) एशियन इन्फ्रास्ट्रकचर इनव्हेस्मेंट बँक परिषद उद्घाटन, उद्योजकांसमवेत बैठक, ११ आँगस्ट २०१८ आयआयटी मुंबई ५६ वा दीक्षान्त समारोह, १९ ऑक्टोबर २०१८ शिर्डी देवस्थान समाधी वर्ष उपस्थिती. पीमे जी घरकुल गृहप्रवेश, १८ डिसेंबर २०१८ मुंबई ट्रायडंट हॉटेल रिपब्लिक परिषद, राजभवन, पुस्तक प्रकाशन टाईमलेस लक्ष्मण, फडके मैदान, कल्याण मेट्रो भूमिपुजन, आर्थिक मागास, एल आय जी हाऊसिंग योजना बालेवाडी स्टेडियम पुणे मेट्रो तिसरा टप्पा भूमिपुजन, १६ फेब्रुवारी २०१९ पांढरकवडा विविध विकासकामांचे लोकार्पण.

धुळे विविध विकासकामांचे लोकार्पण, मुंबई ६ व ७ सप्टेंबर २०१९ मेट्रो स्टेशन भूमिपुजन, औरंगाबाद महिला बचत गट कार्यक्रम संभाजीनगर महिला बचत गट, ६ डिसेंबर २०१९ - ८ डिसेंबर २०१९, पंतप्रधान डीजीपी आयजीपी परिषद पुणे , मुंबई ६ फेब्रुबारी २०२२ लता मंगेशकर श्रध्दांजली, ६ मार्च २०२२ शिवाजी महाराज पुतळा अनावरण, पुणे मेट्रो उद्घाटन विविध विकास कामांचे लोकार्पण, सिमबॉयसिस सुवर्ण महोत्सव कार्यक्रम, १४ जून २०२२ संत तुकाराम महाराज उद्घाटन पुणे जलभूषण , क्रांतीकारक बिल्डींग आणि गॅलरी उद्घाटन, मुंबई समाचार द्विशताब्दी महोत्सव, ११ आणि १२ डिसेंबर २०२२ वंदे भारत झेंडा दाखवणे. नागपूर मेट्रो राईट, नागपूर मेट्रो पहिला टप्पा लोकार्पण व दुसरा टप्पा भूमिपुजन समृद्धी महामार्ग उद्घाटन, एम्स नागपूर लोकार्पण विविध विकास कामांचे लोकार्पण, १९ जानेवारी २०२३.

Chhatrapati Shavaji maharaj statue Collapes
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग ; कारण काय..?

मुंबई विविध विकासकामांचे लोकार्पण, मेट्रो राईड, पीएम स्वनिधी , १० फेब्रुवारी २०२३ मुंबई वंदे भारत ट्रेन उद्घाटन, अलजमिआ तुस सैफिया उद्घाटन, १ आँगस्ट २०२३ पुणे विविध विकासकामांचे उद्घाटन, मेट्रो भूमिपुजन, १४ आँक्टोबर २०२३ मुंबई १४१ आँलंपिक समिती सत्र , २६ आँक्टोबर २०२३ शिर्डी विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण, ४ डिसेंबर २०२३ नौदल दिवस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण, १२ जानेवारी २०२४ अटलसेतू उद्घाटन, नवी मुंबई विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन, १९ जानेवारी २०२४ सोलापूर विविध विकासकामांचे लोकार्पण, २७ फेब्रुवारी २०२४ यवतमाळ विविध विकासकामांचे लोकार्पण, १ एप्रिल २०२४ आरबीआय @९० उद्घाटन कार्यक्रम, १३ जुलै २०२४ , २५ आँगस्ट महाराष्ट्र दौरा, महाराष्ट्र दौरा ३० आँगस्ट असे अनेक कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन केले . यातील बहुतांश प्रकल्प अद्यापही राखडलेले आहेत . तर काही विस्मरणात गेले आहेत . पंतप्रधान मोदी नेमकी कशा कशाची माफी मागणार आहेत . महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे भोळी आहे मात्र मूर्ख नाही. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भ्रष्ट साथीदारांना त्यांच्या अक्षम्य चुकीबद्दल महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com