Raosaheb Danve : रावसाहेब दानवे भाजपला 2019 मधील ‘ते’ करिश्माई यश विधानसभेला मिळवून देणार?

BJP Assembly Election Strategy : लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला राज्यातील 48 पैकी तब्बल 41 जागा जिंकून देण्याचे स्वप्नवत यश दानवे प्रदेशाध्यक्ष असताना मिळाले होते. त्या यशाची पुनरावृत्ती करत भाजपला पुन्हा सत्तेत बसविण्याचे मोठे आव्हान दानवे यांच्यापुढे असणार आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 31 August : आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा भारतीय जनता पक्षाने मास्टर प्लॅन बनविला आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या खांद्यावर भाजपच्या विजयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या दृष्टीकोनातूनच दानवे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचे संयोजकपद देण्यात आलेले आहे.

लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला राज्यातील 48 पैकी तब्बल 41 जागा जिंकून देण्याचे करिश्माई यश दानवे प्रदेशाध्यक्ष असताना मिळाले होते. त्या यशाची पुनरावृत्ती करत भाजपला पुन्हा सत्तेत बसविण्याचे मोठे आव्हान दानवे यांच्यापुढे असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची (BJP) कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना विधानसभा निवडणुकीचे संयोजक बनविण्यात आले आहे. संपूर्ण राज्याची त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 16 समित्या स्थापन करणार आहे. त्या समित्यांच्या संयोजकपदाची जबाबदारी भाजपच्या 16 वरिष्ठ नेत्यांवर असणार आहे. साधारणपणे ज्या ठिकाणचे नेते पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत, त्या भागातील पक्षाच्या संघटनेला बळ देण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या संयोजकपदी नेमणूक करण्यात आलेले रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्रिपदाच्या अगोदर साधारणपणे जानेवारी 2015 पासून 16 जुलै 2019 पर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

Raosaheb Danve
Beed Politics : अजितदादांची राष्ट्रवादी 4 जागांवरच ठाम; उरलेल्या 2 जागांवर भाजप-शिंदेसेनेची वाटणी कशी?

दानवे यांच्याच नेतृत्वाखाली 2019 ची लोकसभा निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबतच्या युतीमध्ये 23 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. त्या यशाची पुनरावृत्ती करण्याची मोठी जबाबदारी आता दानवे यांच्या खांद्यवर असणार आहे.

दानवे हे मराठा समाजातील आश्वासक चेहरा आहेत. मराठवाड्यात त्यांच्यासारख्या रांगड्या नेत्याची पक्षाला गरज असून त्यांच्याच नेतृत्वाखाली मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले होते, त्याच पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा रथ विजयाच्या मार्गावर आणावा, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. आता रावसाहेब दानवे कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखतात, हे पाहावे लागेल.

फडणवीसांना ताकद देणार

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देत फडणवीसांना ताकद देण्याचे काम दानवे करणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे.

Raosaheb Danve
Kolhapur Politics : 'वस्ताद येत आहेत' म्हणत पालकमंत्र्यांविरोधात समरजित घाटगेंनी ठोकला शड्डू, थेट मुश्रीफांच्या दारातच पक्षप्रवेश

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढवल्या जातील. फडणवीस यांच्यासह भाजप नेते महायुतीमधील इतर नेत्यांशी चर्चा करतील. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेला येत्या काही दिवसांत प्रारंभ होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com