Kolhapur Political News : राष्ट्रवादीच्या पायगुणाने भाजपला तीन राज्यांत सत्ता; काँग्रेस कोठेही कमबॅक करत नाही...

Hasan Mushrif हसन मुश्रीफ; कोल्हापूरमधील बिद्री कारखान्यासाठी केले मतदान
Hasan Mushrif
Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

- राहुल गडकर

Kolhapur Political News : मागच्या वेळी विधानसभा निवडणुकीत ज्या राज्यात भाजपला धक्का बसला होता. त्या ठिकाणी त्यांची आज आघाडी आहे. बहुतेक हा राष्ट्रवादीचा पायगुण असावा, असे मिश्किलपणे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच काँग्रेस कोठेही कमबॅक करत नसल्याचा निशाना साधला. कोल्हापूर येथील बिद्री कारखान्यासाठी मतदान करण्याकरिता आले असताना बोलत होते.

कोल्हापुरातील Kolhapur दूधगंगा वेदगंगा सहकारी अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif यांनी बिद्री येथील मतदान केंद्रावर संस्था गटाचा प्रतिनिधी म्हणून मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस त्यांनी सत्ताधारी महालक्ष्मी विकास आघाडी या पॅनेलच्या विजयाचा विश्वासदेखील व्यक्त केला.

Hasan Mushrif
Election Result : तीन राज्यांत भाजपचा विजय; अजित पवार म्हणाले, 'देशाला मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही'

आज 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 5 डिसेंबर रोजी मतमोजणी कोल्हापूर शहरातील मुस्कान लाॅन येथे पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली असून, रात्री उशिरा निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यापैकी तेलंगणा राज्यात काँग्रेस Congress आघाडीवर असून, छत्तीसगड, मध्य प्रदेश राजस्थान राज्यात भाजपने मुसंडी मारली आहे. चारपैकी तीन राज्यांत भाजप आघाडीवर आहे. गेल्या वेळेस या राजांत भाजपचा पराभव झाला होता. कदाचित राष्ट्रवादी Rashtrawadi त्यांच्यासोबत गेल्याचा हा पायगुण असावा, असं म्हणत मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली. तसेच काँग्रेस कुठेही कमबॅक करत नसल्याचा निशाणाही त्यांनी साधला.

Edited By : Amol Sutar

Hasan Mushrif
Telangana NEWS 2023 : घोडेबाजार रोखण्यासाठी अशी होती काँग्रेसची रणनीती ? डी के शिवकुमारांनी सोडला सुटकेचा निश्वास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com