Dhananjay Munde Latest News : करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल लागताच धनंजय मुंडेंकडून खुलासा; आर्थिक स्थिती पाहून...

Karuna Munde Wandre Family Court order News : वांद्रे कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना दिले आहेत.
Dhananjay Munde and Karuna Munde News
Dhananjay Munde and Karuna Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. तसेच कोर्टाने त्या धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी असल्याचेही मान्य केले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडून कोर्टाच्या निकालाबाबत खुलासा करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टाच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोर्टाला घरगुती हिंसाचाराचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. फक्त आर्थिक परिस्थिती पाहून कोर्टाने पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होतो, असे मुंडेंनी आधीच कोर्टात मान्य केले आहे, असे वकिलांनी म्हटले आहे.

Dhananjay Munde and Karuna Munde News
Ranjitsinh Mohite Patil : मोहिते पाटलांना भाजपकडून अभय?; बावनकुळेंच्या कौतुकापाठोपाठ फडणवीसांचीही घेतली भेट!

आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगीचा आहे. घरगुती हिंसाचार अजून कोर्टात सिध्द नाही.धनंजय मुंडेंनी काही चुकीचं केलंय, असं कोर्टाला काही आढळलं नाही, असेही वकिलांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, करुणा मुंडे यांनी कोर्टाच्या आदेशानंतर आपणच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे कोर्टात सिध्द झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Dhananjay Munde Advocate
Dhananjay Munde Advocate Sarkarnama

हायकोर्टात दाद मागणार

वांद्र कोर्टाने पोटगीबाबत दिलेला निकाल करुणा मुंडे यांना मान्य नाही. त्यांनी याविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी वांद्रे कोर्टात १५ लाख रुपये पोटगीची मागणी केली होती. पण कोर्टाने दोन लाख रुपये पोटगीचे आदेश दिले आहे. याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे मुंडेंनी म्हटले आहे.

Dhananjay Munde and Karuna Munde News
Shiv Sena UBT Politics : भाजपची ऑफर सोडून राष्ट्रवादीचे वेध लागलेला उद्धव ठाकरेंचा शिलेदार कोण?

कोर्टाच्या निकालावर मीडियाशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, एका मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीविरोधात ही लढाई होती. मी खूप सोसले आहे. मी 1996 पासून त्यांच्यासोबत आहे. माझ्या कुटुंबासाठी 15 लाख रुपये पोटगी मागितली होती. त्यासाठी हायकोर्टात जाणार आहे. मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी होती. माझे उत्पन्न काही नाही. माझ्या नवऱ्याने जी गाडी दिली होती, ती माझ्याकडून घेऊन त्यांच्या वकिलाला दिली. येरवडा, बीड कारागृहात मला डांबण्यात आले होते. गाडीत रिव्हॉल्वर ठेवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com