Why 2000 Note Demonetize : 2016 ची नोटबंदी आज खऱ्या अर्थाने पूर्ण; अर्थतज्ञ यमाजी मालकर यांचा दावा

RBI Announcement Today : एकाकडून दिवसाला स्वीकारणार दोन हजारांच्या १० नोटा
2000 Note
2000 NoteSarkarnama

RBI on 2000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. दरम्यान, आरबीआयने सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा ग्राहकांना न देण्याची सूचना केली आहे. आरबीआयने म्हटले की, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहतील. सध्या दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागणार आहेत.

2000 Note
Demonetization of 2000 Note : दोन हजार रुपयांची नोटबंद; बँक दिवसाला स्वीकारणार 'इतकी' रक्कम

आरबीआयच्या (RBI) म्हणण्यानुसार 2018-19 मध्येच 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली होती. आरबीआयने 2016 मध्ये एक हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी घातली होती. त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. त्यावेळीच या नोटा जास्त काळ चलनात ठेवल्या जाणार नाहीत, असा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने आपल्या धोरणानुसार काम केले. सरकारने आज नोटाबंदी पूर्णपणे अंमलात आणल्याचे 'सरकारनामा लाइव्ह'मध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी सांगितले.

2000 Note
RBI Withdraw 2000 RS Currency Note : दोन हजाराची नोट बंद झाल्यानंतर, तुम्ही काय करायला हवं?

काळ्या पैशावर हल्ला

२०१६ नंतर काही लोकांनी त्यांच्या काळा पैसा 2,000 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात ठेवण्यास सुरूवात केल्याचे सरकारचे निरीक्षण आहे. आरबीआयने 2018-19 पासूनच दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद केली होती. सामान्य लोकांकडे आता फारच कमी 2000 च्या नोटा उरल्या होत्या. आता आरबीआयने या नोटा बंद करण्याची घोषणा केल्याने पुन्हा एकदा काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बाहेर येणार असल्याचे स्पष्ट झाले. या नोटा बँकांमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींवर सरकारची नजर असणार आहे. (Demonetization)

2000 Note
RBI Big Announcement: मोदी सरकारची दुसरी नोदबंदी; एक ऑक्टोबरपासून दोन हजाराची नोट होणार कागदाचा तुकडा

दहशतवाद, मनी लाँड्रिंगला ब्रेक

2016 मध्ये 500 आणि हजाराच्या नोटा बंद झाल्या, त्यावेळी दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक रसद तोडल्याचा दावा सरकारने केला होता. त्याचप्रमाणे मनी लाँड्रिंगलाही आळा बसला होता. त्यानंतर मात्र हळूहळू या बेकायदेशीर कामांसाठी दोन हजाराच्या नोटा वापरल्या जाऊ लागल्या. तसेच अलिकडे मोठ्या प्रमाणात मनीलॉड्रिंगची प्रकरणे समोर आलेली आहेत. आता दोन हजारांची नोटबंद केल्याने पुन्हा एकदा दहशतवाद्यांना मिळणारा निधी आणि मनी लॉन्ड्रिंगवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

2000 Note
Siddaramaiah Oath Ceremony : सिद्धरामय्यांच्या शपथविधीसाठी उद्धव ते ममता सर्वांनाच निमंत्रण ! काय आहे कारण ?

बनावट नोटांच्या छपाईवर अंकुश

काही वर्षांपासून दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाईही वेगाने केली जात होती. ही नोट बाजारात सहज चालवता येत होती. आता त्यावर बंदी घालण्यात आल्याने बाजारातील दोन हजार रुपयांच्या सर्व बनावट नोटाही साफ होणार आहेत. याशिवाय बनावट नोटांच्या छपाईलाही मोठ्या प्रमाणात लगाम बसणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com