Pune election strategy : भाजपच्या या ‘त्रिकुटा’चा करिष्मा; असा जिंकला पुण्याचा गड!

BJP Pune candidate selection planning : पुण्यातील निवडणूक रणनीतीत भाजपने समन्वय आणि संघटनात्मक कौशल्याचा प्रभावी वापर केल्याचा निश्चितच फायदा झाला आहे.
bjp flag
bjp flagsarkarnama
Published on
Updated on

उमेदवार निश्चित करताना प्रत्येक जागेवर घातलेले वैयक्तिक लक्ष, पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे मांडलेले व्हीजन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी समन्वयाने आखलेले डावपेच आणि संघटनात्मक कौशल्याचा नियोजनबद्ध पद्धतीने केलेला उपयोग या नियंत्रण होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, त्यांना प्रचारात आणण्याचे काम मोहोळ आणि पाटील यांनी केले.

मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराची यंत्रणा ताब्यात घेऊन, सौम्य भाषेत अजित पवार यांच्यासोबत दोन हात केले. भाजप विरोधकांना एकमेकांमध्ये झुंजविण्यात या नेत्यांना यश आले. भाजपच्या फडणवीस, मोहोळ आणि पाटील या त्रिकुटाने सामूहिक प्रयत्नातून विक्रमी बहुमत मिळवले.

bjp flag
Manikarnika Ghat: अहिल्याबाईंनी बनवलेल्या मणिकर्णिका घाटाचा 234 वर्षांनंतर कायापालट! मोदींच्या स्वप्नातील 'हायटेक मोक्षधाम' कसा असेल?

पुणे महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप ३० जागांच्या जवळपास घुटमळत होता. २०१७ मध्ये भाजपला पहिल्यांदा ९७ जागा मिळाल्या. पाच वर्ष एकहाती सत्ता राबविली. त्यामुळे २०२६ च्या निवडणुकीत किती जागा मिळणार, याची उत्सुकता लागली होती. यासाठी भाजपने अनेक महिन्यांपासून तयारी सुरु केली होती. त्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रभाग रचना करताना, ती भाजपच्या उमेदवारांसाठी पोषक ठरेल अशी रचना करण्यात आली. त्यामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहराचा बारीक अभ्यास केला.

भाजपने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले. त्यात २३०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले. त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. हे सर्व घडत असताना प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, मोर्चांचे प्रमुखांनी त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या.

शहरात कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असला पाहिजे, यासाठी भाजपने अनेक सर्वेक्षण केले. पक्षाचे सर्वेक्षण वेगळे होते, त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वैयक्तीक पातळीवर योग्य उमेदवारासाठी परीक्षण सुरु केले होते. ज्या भागात भाजपची ताकद कमी आहे, अशा ठिकाणी महत्त्वाचे पक्षप्रवेश घडवून आणले. यामध्ये वडगाव शेरीत पठारे, वारजे येथे दोडके, वांजळे, बराटे, धनकवडीत बाळा धनकवडे यांचा पक्ष प्रवेश महत्त्वाचा ठरला.

त्यामुळे जे प्रभाग भाजपसाठी कायम अवघड होते, अशा ठिकाणी भाजपच्या १२ जागा निवडून आल्या. या निवडणुकीत भाजपने ४० माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. त्यातील १३ जणांच्या घरात उमेदवारी दिली. तर उर्वरित ठिकाणी पूर्णपणे नवे उमेदवार देण्यात आले. ५० टक्क्याच्या आरक्षणाच्या निकषानुसार भाजपने ८३ महिलांना उमेदवारी देणे अपेक्षित होते पण त्यांनी ९२ ठिकाणी महिला उमेदवार देऊन विरोधकांना आव्हान दिले.

bjp flag
BJP Candidate Controversy : अश्विनी जगतापांचा मतदानाच्या काही तासांपूर्वी टाकला 'नमकहरामी' बॉम्ब ; प्रभाग क्रमांक 31 मध्ये कुणी उधळला गुलाल ?

त्याचा फायदा भाजपला झाला. प्रभाग क्रमांक ४० मध्ये भाजपने चार महिला दिल्या. त्या सर्व विजयी झाल्या आहेत. पुरुष उमेदवारांपुढेही महिला उमेदवारांनी चांगली लढत देऊन प्रभाग खेचून आणला आहे. काही माजी नगरसेवकांना त्यांचे स्वतःचे प्रभाग सोडून, अन्य ठिकाणी निवडणूक लढविण्यास भाग पाडले, त्यात देखील भाजपची रणनीती यशस्वी ठरली.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व विरोधीपक्ष एकत्र येतील, अशी स्थिती होती. पण विरोधीपक्षात पडलेली फूट ही भाजपच्या पथ्यावर पडली. विरोधी पक्षांचे पॅनेल चांगले होऊ नयेत, यासाठी भाजपने खेळी खेळल्या. प्रत्येक प्रभागात चौरंगी, पंचरंगी निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. त्यात भाजपचा फायदा झाला. ज्या ज्या प्रभागात मतांची विभागणी झाली. तेथे भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. भाजपने निवडणुकीचा जाहीरनामा तयार करताना त्याला केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांशी जोड घालण्यात आली.

bjp flag
Uddhav Thackeray: "आमच्या पराजयाला तेज, त्यांच्या विजयाला डाग"; उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका

जेथे विजय अवघड होता तेथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा उपयुक्त ठरली. अभिनेत्री गिरिजा ओक यांच्यासोबत केलेल्या चर्चेतून फडणवीस यांनी पुण्याचे व्हीजन मांडले. त्यानंतरही प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही गोखलेनगर येथे सभा घेऊन, फडणवीसांनी या भागातील पराभवाच्या छायेतील १२ पैकी १० जागांवरील विजय खेचून आणला. शहरातील प्रमुख पदाधिकारी त्यांच्या प्रभागात अडकून पडलेले असताना या प्रमुख नेत्यांनी पुणेकरांची नस ओळखून प्रचारयंत्रणा राबविली आणि दणदणीत यश मिळवले. यात फडणवीस, मोहोळ आणि पाटील या त्रिकुटाची भूमिका महत्त्वाची ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com