Eknath Shinde : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी अपडेट; शिंदेंच्या शिवसेनेकडून अजितदादांच्या NCP ला संपर्क? केली 'ही' विनंती ?

Mahayuti New Chief Minister : विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर 132 चा आकडा गाठलेल्या भाजपकडून सातत्यानं मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढं करण्यात येत आहे. तसा निर्णयही पुढील 48 तासांत दिल्लीतून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.
Eknath Shinde and ajit pawar.jpg
Eknath Shinde and ajit pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्रिपदावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच आता दिल्लीतून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावावर उपमुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, आता राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी आग्रही आहेत. एकीकडे त्यांनी आपल्या सीएम पदाचा राजीनामा दिला असून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला आहे. पण यानंतर आता शिंदेंनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला समर्थन द्या यासाठी थेट मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना संपर्क करून सीएम पदासाठी पाठिंबा देण्यासंदर्भात विनंती करण्यात आल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.त्यात महायुतीच्या मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत सोमवारी (ता.25) फोनवरुन चर्चा झाली असल्याचं यात म्हटलं आहे.

Eknath Shinde and ajit pawar.jpg
Rajya Sabha Election News : मोठी बातमी! राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या, संपूर्ण वेळापत्रक

विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर 132 चा आकडा गाठलेल्या भाजपकडून सातत्यानं मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढं करण्यात येत आहे. तसा निर्णयही पुढील 48 तासांत दिल्लीतून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

मुंबईत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याचं समोर येत आहे.त्यात शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी समर्थन देण्यात यावं. जेणेकरुन भाजपवर दबाव निर्णय होईल, आणि यातून वेगळा निर्णय घेतला जाईल. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार असून त्यांना 3 अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांचं संख्याबळ हे 60 वर पोचले आहे.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 41 आमदार आहे.

Eknath Shinde and ajit pawar.jpg
Mahayuti CM Update : महायुतीच्या विजयात शिंदेंचा मोठा वाटा, पण 'CM' भाजपचाच झाला पाहिजे; केंद्रीय मंत्र्यानं सांगितलं 'हे' कारण

जर अजित पवारांच्या पक्षानं शिंदेंना समर्थन दिलं तर तर एकूण 101 आमदारांचं शिंदेंना पसंती असल्याचं निश्चित होईल. पण याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे यांची समजूत कशी काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजप कोअर कमिटी फडणवीसांच्या नावाला अनुकूल आहे. त्यांचा या भावना भाजप हायकंमाडला पोहचविण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा रंगत असताना मोठी माहिती समोर येत आहे. 178 आमदारांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे.

Eknath Shinde and ajit pawar.jpg
K.P.Patil News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'मशाल' हाती घेतलेल्या के. पी पाटलांच्या पराभवाची कारणं!

भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत, त्यांचा स्टाईक रेटसुद्धा जास्त आहे. भाजपसह त्यांना पाठींबा देणारे पाच अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 अशा 178 आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत, अशी आग्रही मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com