Indira Gandhi : जेव्हा पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षाच्या 'त्या' कृत्याने इंदिराजींचा रागाचा पारा चढला! पुढे काय झाले?

Indira Gandhi Death Anniversary : 'जग तुम्हाला लोकशाहीवादी म्हणते आणि मला हुकूमशहा!' असे का म्हणाल्या होत्या इंदिरा गांधी?
Indira Gandhi
Indira GandhiSarkarnama
Published on
Updated on

Indira Gandhi Death Anniversary 2024: ‘आयर्न लेडी’ अशी ओळख असलेल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने आज त्यांच्या कार्याचे स्मरण करताना पाकिस्तानशी संबंधित एक किस्सा सांगितला पाहिजे असाच आहे.

अंगरक्षकांनीच केली होती हत्या -

३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी अंगरक्षकांनीच इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांची हत्या केली होती. १९६६ ते १९७७ आणि पुन्हा १९८० ते १९८४ पर्यंत अशा दोन मोठ्या कालखंडांत इंदिराजींनी देशाचे नेतृत्व केले. त्यांनी आपल्या निर्भय नेतृत्वाने देशात नवे मानदंड प्रस्थापित केले.

नेमके काय झाले? -

तर तो किस्सा असा आहे..! १९८० साली झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्यदिनी इंदिरा गांधी यांना निमंत्रित करण्यात आले होते. तिथेच पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल झिया उल हक देखील उपस्थित होते. हरारेच्या हॉटेलमध्ये झिया उल हक यांनी इंदिरा गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या घटनेची नोंद भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांच्या 'वॉकिंग विथ लायन्स' या पुस्तकामध्ये आहे.

Indira Gandhi
Priyanka Gandhi : मी बाथरुम स्वच्छ केले, भांडी घासली! प्रियांका गांधींनी पहिल्यांदाच सांगितली 'ती' आठवण

इंदिरा गांधी व झिया उल हक यांच्या चर्चेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी चेष्टेच्या स्वरात इंदिरा गांधी या झिया उल हक यांना म्हणाल्या की जग तुम्हाला लोकशाहीवादी म्हणते आणि मला हुकूमशहा!

दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर झिया उल हक यांनी इंदिराजींना एक पुस्तक भेट दिले. परंतु त्या पुस्तकातील नकाशामध्ये काश्मीरचा भाग पाकिस्तानचा दर्शविल्यामुळे इंदिराजी प्रचंड संतापल्या. त्यांनी त्वरित नटवर सिंह यांना आदेश दिला की त्या पुस्तकासोबत एक तीव्र आक्षेप नोंदवून ते पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवण्यात यावे.

Indira Gandhi
Hemant Soren: हेमंत सोरेन यांचं वय 5 वर्षांत 7 वर्षे वाढले! नेमकी गडबड काय आहे?

या घटनेने केवळ द्विपक्षीय संबंधांची मर्यादा दाखवली नाही, तर इंदिराजींच्या तीव्रतेचा आणि परराष्ट्र धोरणातील ठाम भूमिकेचा आणखी एक नमुना इतिहासात नोंदवला गेला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com