Sandeep Kshirsagar : ‘जयदत्त क्षीरसागर सध्या ‘राजकीय फ्रेम’मध्येच नाहीत, त्यामुळे बीडमध्ये मला कोणीही प्रतिस्पर्धी नाही’

Beed Assembly Election 2024 : एकाच कुटुंबातील तीन क्षीरसागर विधानसभा निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा फटका बसेल, असे मला तरी काय वाटत नाही.
Sandeep Kshirsagar
Sandeep KshirsagarSarkarnama

Beed, 17 June : बीडमध्ये आज मला कोणीही प्रतिस्पर्धी दिसत नाही. कोणत्या पक्षाकडून कोण लढणार, याचीच खात्री नाही. निवडणुकीसाठी तुमच्याकडे ठोस भूमिका असावी लागते. माझ्याकडे तशी ठोस भूमिका आहे. शरद पवारांचा आशीर्वाद आहे. समोरच्या लोकांकडे अजून चिन्हच नाही, त्यामुळे ते माझे प्रतिस्पर्धीच असूच शकत नाहीत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सध्या कोणत्याही ‘राजकीय फ्रेम’मध्ये नाहीत, त्यामुळे बीडमध्ये मला कोणीही प्रतिस्पर्धी नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.

विधानसभेत (Assembly Election 2024) क्षीरसागर कुटुंबीयांत लढत होईल का, यावर संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) म्हणाले, लोकशाहीत सर्वांनाच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. हे केवळ बीडपुरतं चित्र नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रात हेच चित्र आहे. भाजपने पक्ष फोडले, निवडून आलेले लोक घेऊन गेले. मात्र, बीडमध्ये कोणीही दिग्गज नेता आमच्यासोबत नसताना शरद पवार (Sharad Pawr) यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य घरातील बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली.

राजकारणात भूमिका महत्वाची असते. एका निवडणुकीत एक भूमिका घेता आणि दुसऱ्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेता, हे चालत नाही. काही लोकांनी पक्ष आणि विचार बदलले, पण ते लोकांना आवडत नाही आणि लोक ते स्वीकारत नाही, असा टोला त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला.

बीडमध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडून संदीप क्षीरसागर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून योगेश क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारले असता संदीप क्षीरसागर म्हणाले, एकाच कुटुंबातील तीन क्षीरसागर विधानसभा निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा फटका बसेल, असे मला तरी काय वाटत नाही.

Sandeep Kshirsagar
Jaidatta Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत येणार? संदीप क्षीरसागरांनी केला मोठा दावा

ही लोकशाही आहे, लोकशाहीत ज्याला कोणाला विधानसभा निवडणुकीत उभं राहायचं आहे. त्यांनी उभं राहावं. सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला कोणत्याच निवडणुकीची अडचण वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे बजरंग सोनवणे निवडून आले आहेत. पूर्वी मी एकटा आमदार होतो. सोनवणे यांच्या विजयानंतर आमची बीडमध्ये ताकद वाढली आहे. लोकसभेची निवडणूक जातीवर झाली, असा आरोप होत असला तरी माझ्यासारख्या काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी घरं असणाऱ्या कार्यकर्त्याला बीडच्या जनतेने आमदार केले आहे. माझी आजीही पंधरा वर्षे खासदार होती. त्यामुळे मला बीडमध्ये जातीवरून निवडणूक झाली, असं वाटत नाही, असेही संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Sandeep Kshirsagar
Jaidatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागरांची राजकीय खेळपट्टी ठरली; टीम अजूनही ठरेना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com