Kolhapur Politics : बाबू फरास यांनी जिन्यातच नगरसेवक फोडले अन् महाडिकांच्या कोल्हापुरातील सत्तेला पहिला हादरा बसला!

Kolhapur Politics : 1998 मध्ये कोल्हापूर महापौर निवडणुकीत महाडिक गटाला पहिल्यांदा धक्का बसला. दिलीप मगदूर आणि बाबू फरास यांच्या बंडखोरीमुळे महादेवराव महाडिक यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण झाले.
1998 Kolhapur mayoral election witnessed rebellion within Mahadevrao Mahadik group.
1998 Kolhapur mayoral election witnessed rebellion within Mahadevrao Mahadik group.Sarkarnama
Published on
Updated on

- राहुल गडकर, सरकारनामा प्रतिनिधी

Kolhapur Politics : कोल्हापूरचं राजकारण हा भल्या भल्यांना न समजणारा विषय मानला जातो. इथल्या राजकीय घडामोडींमुळे हा जिल्हा राज्यात नेहमीच चर्चेत असतो. इथे पक्षाचे नाही तर गटातटाचे राजकारण होत असते. महाडिक गट, पाटील गट, मुश्रीफ गट, नरके गट असे अनेक गट शहर आणि जिल्ह्यात आहेत. हे गट कधी एकमेकांचे मित्र असतात तर कधी एकमेकांचे शत्रू. पण सन 1998 मधील महापौर निवडणुकीत एकाच गटातील दोन नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली. जिन्यातच सत्ताधारी गटाचे नगरसेवक फुटले आणि बंडखोरी केलेल्या नेत्याच्या गटाचा महापौर निवडला गेला. इथेच महाडिक यांच्या वर्चस्वाला पहिला हादरा बसला.

17 नोव्हेंबर 1998. कोल्हापूर महानगरपालिकेची महापौरपदाची निवडणूक होती. त्यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेवर महादेवराव महाडिक यांची एक हाती सत्ता होती. महाडिक यांचे राजकारण म्हणजे दोन्हीही उमेदवारांवर दावा सांगून निवडून येणारा उमेदवार तो महाडिक गटाचा, असे त्यावेळचे समीकरण असे. मग त्यासाठी कोणताही तडजोड महाडिक गटाकडून करण्यात येत होती. पण त्यादिवशीच्या घटनेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला पहिला सुरुंग लावला तोही महाडिक गटाच्याच पदाधिकाऱ्यांनी.

त्यावेळी महापालिकेच्या राजकारणात बाबू फरास आणि दिलीप मगदूम हे दोघेही महाडिक गटाचे प्रमुख पदाधिकारी होते. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी कांचनताई कवाळे आणि माया भंडारे या दोन उमेदवारांची नावे चर्चेत होती. दिलीप मगदूम यांनी महाडिक गटातून महापौरपदासाठी माया भंडारी यांचे नाव दिले. पण बाबू फरास यांनी यावेळी बंडखोरी करत कांचनताई कवाळे यांची उमेदवारी निश्चित केली. बंडखोरी झाल्यानंतर महाडिक गटातील नगरसेवक बाबू फरास यांच्या संपर्कात जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी दिलीप मगदूम यांनी घेतली.

1998 Kolhapur mayoral election witnessed rebellion within Mahadevrao Mahadik group.
Kolhapur ZP Election :  सरकारने वापरले निवडणूक आयोगाचे अधिकार? ZP च्या प्रभाग रचनेचा आज फैसला

महापौर निवड दुसऱ्या दिवशी होणार होती. पण आदल्या दिवशी बाबू फरास यांनी राजकीय गणित पटलावर मांडले. काहींना स्वतंत्र भेटले तर काहींना त्रयस्थ यंत्रणेमार्फत निरोप पाठवले. मात्र अनेकांचा संपर्क झाला नाही. तरी देखील बाबू फरास यांनी आदल्या दिवशी महापालिका कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना आत्मविश्वासाने उद्या बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार, असे जाहीरपणे सांगितले. दुसरीकडे दिलीप मगदूम यांनीही अत्यंत टाईट फिल्डिंग लावली होती. काही जणांना कराडच्या संगम हॉटेलवर, काही जणांना कोल्हापुरातील एका हॉटेलवर ठेवण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सर्व नगरसेवकांना महापौरपदाच्या निवडणुकीत नेण्यासाठी तयारी सुरु झाली. दिलीप मगदूम सर्वच आपल्या सोबत असल्याने कोणीही दगाबाजी करणार नाही, या अविर्भावात होते. काही वेळातच महाडिक गटाच्या सर्व नगरसेवकांना महापालिकेत आणण्यात आले. महापालिकेच्या वर्तुळात सर्व प्रमुख नेते खाली उभे होते. बाबू फरास आणि त्यांचे काही प्रमुख नगरसेवक जिन्यात उभे होते. त्याचवेळी नगरसेवकांना हेरून बाबू फरास यांनी आपल्याला मदत करण्याचे आवाहन केले. अनेक तडजोडी या जिन्याच्या मधल्या टप्प्यातच झाल्या.

1998 Kolhapur mayoral election witnessed rebellion within Mahadevrao Mahadik group.
Kolhapur ZP: आमदार-खासदार मतदारसंघ आरक्षणानंतरच राजकीय पत्ते खोलणार; अनेकांची सावध चाल

हळूहळू सर्व नगरसेवक महापौर निवडीसाठी सभागृहात गेले. कांचनताई कवाळे आणि माया भंडारी यांना महापौर पदाचे उमेदवार ठरवून मतदान झाले. निकालात बाबू फरास यांच्या उमेदवार कांचनताई कवाळे यांचे महापौर पदी विजयी झाल्या होत्या. महाडिक गटाच्याच उमेदवार असलेल्या माया भंडारी यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी स्वतः बाबू फरास महापौरपदाचे उमेदवार झाले. त्यांनी महाडिक गटाच्या नंदकुमार सुर्यवंशी यांचा पराभव केला. तो कसा ते पुढच्या स्टोरीमध्ये सांगू पण या निवडणुकीनंतर महाडिक गटाच्या महापालिकेतील एकहाती वर्चस्वाला हादरा बसला तो बसलाच. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात ही घटना आजही चर्चेत असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com