लतादिदींच मूळ नाव हेमा होतं! आणि आडनावही मंगेशकर नव्हतं...

लतादिदींच्या (Lata Mangeshkar) आठवणींचा सोशल मिडियात पूर आला आहे. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Lata Mangeshkar passed away
Lata Mangeshkar passed awaySarkarnama
Published on
Updated on

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने प्रत्येक भारतीय भावूक झाला आहे. लतादिदींचे गाणे ऐकले नाही, असा आयुष्यातील दिवस विरळाच. त्यामुळे लतादिदींचा ट्रेंड सोशल मिडियात अतिशय भावोत्कट पद्धतीने सुरू आहे. प्रत्येक जण आपल्या आठवणी, नवीन माहिती, आवडलेली गाणी सांगत आहे.

लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मोठे गायक होतेच. पण ते उत्तम नटही होते. त्यांनी अनेक मराठी संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. याविषयी ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची यांनी आठवणी लिहिल्या आहेत. ते लिहितात ``१९४२ साली वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षांपासून भारतीय सिनेमा जगताला त्या आपला आवाज देत होत्या. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आजतागायत लतादिदींनी एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये आणि जवळजवळ ३६ हून अधिक प्रादेशिक भाषेतली गाणी गायली आहेत. या सोबतच लतादिदींनी अनेक विदेशी भाषांतूनही गायन केलेलं आहे. संगीताच्या या महानायिकेनं सर्वात जास्त गाणी मराठी आणि हिंदी भाषेत गायिली आहेत. लताजी सर्वाधिक गाणी रेकाॅर्ड करणाऱ्या म्युझिक आर्टिस्ट म्हणूनही ओळखल्या जात होत्या.``

Lata Mangeshkar passed away
Lata Mangeshkar : भारतीय संगीताचा आत्मा हरपला : फडणवीस

लता मंगेशकर यांचा जन्म, परिवार, प्रारंभिक जीवन भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला मध्यप्रदेशातल्या इंदौर इथं एका गोमंतक ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल पंडित दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि थिएटर कलावंत होते त्यामुळं लतादिदींना संगीताचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले होते. लताजींच्या आईचं नाव शेवंती-शुधामती होतं आणि त्या महाराष्ट्रातल्या थालनेर इथल्या होत्या आणि पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत. सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं मूळ आडनाव हर्डीकर असं आहे परंतु त्यांच्या वडिलांनी ते बदलून आपल्या मूळ गावावरून ते मंगेशकर असं केलं त्याचं कारण म्हणजे आपल्या नावानं आपल्या गावाचं, मंगेशीचं, गोव्याचं प्रतिनिधीत्व करावं अशी त्यांची धारणा होती. पुढं लतादिदींच्या जन्मानंतर काही काळातच हा पूर्ण परिवार महाराष्ट्रात स्थानांतरीत झाला. लताजींना लहानपणी ‘हेमा’ या नावानं हाक मारली जात असे परंतु पुढं त्यांच्या वडिलांनी एका ‘भावबंधन’ या नाटकामुळं प्रभावित होऊन त्यांचं नाव बदलून लता असं केलं. आणि त्यानंतर संगीताच्या क्षेत्रात लता नावानं एक किर्तीमान स्थापित केला.

Lata Mangeshkar passed away
Lata Mangeshkar : तो स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही : मुख्यमंत्री

हरिश केंची या ब्लाॅग पुढीलप्रमाणे :

लता या आपल्या आईवडिलांच्या सर्वात मोठया आणि पहिलं अपत्य होत त्यांची एकूण चार लहान बहिण भावंड आहेत, मीना, आशा भोसले, उषा आणि हृदयनाथ. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यानं सुरांची जादुगार लताजींनी गाण्याचे सुरूवातीचे धडे आपल्या वडिलांसमवेत गिरवले होते. आपल्या वडिलांकडून आपल्या भावंडांसमवेत त्या शास्त्रीय संगीत शिकत असत. आपल्यापैकी कित्येकांना हे माहित नसेल की, वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षांपासून त्या आपल्या वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये अभिनय करत असत. लता ही संगीत क्षेत्रातली एक अद्भुत चमत्कार आहे याची जाणीव त्यांच्या वडिलांना तिच्या लहानपणीच झाली होती. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी या स्वरसम्राज्ञीनं शास्त्रीय संगीताची मैफिल सजविली होती. लहानपणापासून संगीतात आवड असल्यानं लताजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमानत खान, बडे़ गुलाम अली खान, पंडित तुलसीदास शर्मा आणि अमानत खान देवसल्ले यांच्याकडून घेतलं होतं. त्यावेळी लताजी के.एल. सहगल यांच्या संगीतानं फार प्रभावित होत्या. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. संगीतातला चमत्कार मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्यावर त्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला ज्यावेळी त्यांच्या वडिलांना हृदयविकारानं ग्रासलं आणि आपला गोकुळासारखा परिवार सोडून ते ईहलोकीच्या यात्रेला निघून गेले. त्या सुमारास लता केवळ १३ वर्षांच्या होत्या. कुटुंबात त्याच मोठ्या असल्यानं आपल्या बहिण भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली, परिणामी लताजींनी बालवयातच आपल्या परिवाराच्या भरणपोषणाकरता काम करणं सुरू केलं.

Lata Mangeshkar passed away
Lata mangeshkar इतका सोपा नव्हता लतादीदींचा संगीतमय प्रवास

लता मंगेशकर यांची कारकिर्द वयाच्या १३ व्या वर्षी लतादिदींनी आपल्या करियरला सुरूवात केली आणि तेव्हापासून आजतागायत आपला सुमधूर आवाज त्या भारतीय सिनेमाला देत होत्या. लतादिदींनी पहिलं गाणं १९४२ साली मराठी चित्रपट ‘किती हसाल’ करिता ‘नाचु या ना गडे खेळु सारी, मनी हौस भारी...!' गायिले होते या गीताला सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबध्द केलं होतं परंतु या चित्रपटाच्या एडिटींग दरम्यान या गीताला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. पुढं नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि लतादिदींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या मृत्युपश्चात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आणि लता मंगेशकरांना एक गायिका आणि अभिनेत्री बनवण्यात मदत केली. मास्टर विनायक यांनी लताला १९४२ साली मराठी चित्रपट ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका देखील दिली होती, ज्यात लताजींनी एक गीत देखील गायिलं होतं. जरी लतानं आपली कारकिर्द मराठी गायिका आणि अभिनेत्री म्हणुन सुरू केली असली तरी त्याकाळी असं कुणालाही वाटलं नाही की ही लहान मुलगी पुढं एक दिवस हिंदी सिनेसृष्टीत एक प्रसिध्द आणि सुमधुर गायिका होणार आहे. तसं त्यांचं पहिलं हिंदी गीत देखील १९४३ ला आलेल्या मराठी चित्रपटातलंच होतं. ते गीत ‘माता एक सपुत की दुनियां बदल दे तू’ असं होतं आणि चित्रपटाचं नाव होतं ‘गजाभाऊ’! पुढं लताजी १९४५ साली मास्टर विनायक कंपनीसोबत मुंबईला गेल्या आणि इथूनच त्यांनी आपली संगीत प्रतिभा आणखीन उज्वल होण्याकरीता उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. या दरम्यान लताला अनेक संगीतकारांनी तिच्या आवाजाची पातळ आणि कर्कशः अशी अवहेलना करत रिजेक्ट केलं कारण तिचा आवाज त्या दरम्यान पसंत केल्या जाणाऱ्या आवाजांपेक्षा अगदी भिन्न होता आणि त्याच सुमारास लताला त्याकाळच्या प्रसिध्द गायिका नुरजहांकरता देखील गाण्यास सांगितलं जात होतं.

Lata Mangeshkar passed away
Lata Mangeshkar यांचे गाणे नसल्याने `मेरा नाम जोकर` ही फ्लाॅप ठरला होता...

१९४८ ला मास्टर विनायक यांच्या मृत्युमुळं लताजींचा आणखी एक आधारवड कोसळला आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्या एकाकी पडल्या. यामुळंच त्यांची सुरूवातीची वर्ष अत्यंत संघर्षपूर्ण राहीली. मास्टर विनायक यांच्या मृत्युपश्चात गुलाम हैदर यांनी लताला तिच्या कारकिर्दीत बरीच मदत केली. १९४८ साली मजदूर चित्रपटातलं ‘दिल मेरा तोडा मुझे कहीं का ना छोडा’ गीतानं लता मंगेशकरांना ओळख मिळाली यानंतर लगेच १९४९ ला आलेल्या ‘महल’साठी लतानं आपलं पहिलं सुपरहिट गीत ‘आयेगा…आयेगा…आयेगा आनेवाला...!' हे गायिलं. या गीतानंतर लताला मोठमोठ्या संगीतकारांच्या नजरेत ओळख मिळाली त्यामुळं तिला एकामागे एक अनेक गीतांच्या आॅफर्स मिळत गेल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com