Chandrapur Mahapalika: चंद्रपूरच्या महापौर पदाबाबत मोठा निर्णय; काँग्रेसनं धानोरकरांसह वडेट्टीवारांचीही मर्जी राखली, असा काढला तोडगा

Chandrapur Congress Controversy : दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते के सी वेणुगोपालराव यांच्यासमवेत चंद्रपूर महानगरपालिकेतील वादाबाबत मंगळवारी (ता.3) महत्त्वाची बैठक पार पडली . या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर व विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते.
Chandrapur Mayor Election
Chandrapur Mayor Election Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर आणि मित्रपक्षांसह बहुमत मिळवल्यानंतरही काँग्रेसमध्ये महापौरपदावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. एकीकडे सत्तास्थापनेची पूर्ण संधी असतानाही काँग्रेसमधील गटबाजीमुळे सत्तास्थापनेचं घोडं अडलं होतं. अखेर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष इतका टोकाला पोहोचला की वडेट्टीवारांनी काँग्रेस नगरसेवकांसह थेट दिल्लीच गाठली. दिल्लीतील बैठकीनंतर धानोरकर-वडेट्टीवार वाद मिटला असल्याचं समोर येत आहे. धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या गटाला प्रत्येकी अडीच अडीच वर्षे महापौर पद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते के सी वेणुगोपालराव यांच्यासमवेत चंद्रपूर महानगरपालिकेतील वादाबाबत मंगळवारी (ता.3) महत्त्वाची बैठक पार पडली . या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर व विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर धानोरकरांच्या गटाला महापौर तर वडेट्टीवार यांच्या गटाला उपमहापौर पद देण्यात आल्याची चर्चा होती.पण अखेर बुधवारी(ता.4) चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाबाबत मोठा निर्णय समोर आला आहे.

चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपदाच्या वादात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 13 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले होते. तर वडेट्टीवार यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आपणही माघार घेणार नसल्याचे संकेत दिले होते.

काँग्रेसच्या 27 नगरसेवकांमध्ये दोन गट पडले असून यांपैकी धानोरकर गटाकडं 13 तर वडेट्टीवार गटाकडं 14 नगरसेवक आहेत. चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 सदस्यसंख्या असून काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपकडे 23 सदस्य आहेत. काँग्रेसला बहुमतासाठी 6 तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे.

Chandrapur Mayor Election
Mamata Banerjee News: इतिहासात पहिल्यांदाच CM पदर खोचून उतरल्या कोर्टात; ममता बॅनर्जींनी सरन्यायाधीशांसमोरच निवडणूक आयोगाला दाखवला हिसका

उद्धव ठाकरे सेनेने वंचित आघाडीला सोबत घेऊन 8 नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आणखीच पेच वाढला आहे. जनविकास सेनेचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक असले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोघांचीही अडचण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com