Fadnavis Government : ठेकेदारांचे पैसे फेडताना 'फडणवीस सरकार' घाईला येणार? देणेकरांची यादी मारुतीच्या शेपटीपेक्षा मोठी

Fadnavis Government : लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहे. त्यामुळे नगरविकास विभाग, जलसंपदा विभाग, जलजीवन मिशन योजना, सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांची 90 हजार कोटींची थकबाकी आहे.
CM Devendra Fadnavis | Maharashtra Government
CM Devendra Fadnavis | Maharashtra GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Fadnavis Government : सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण ठेकेदार हर्षल पाटील यांनी नुकतीच जीवनयात्रा संपवली. सरकारकडून जलजीवन मिशनचे पैसे थकल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असा, आरोप कंत्राटदार संघटनेकडून केला जात आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही पावसाळी अधिवेशनात सरकारने कंत्राटदारांची देणी द्यावीत अन्यथा त्यांना आत्महत्या कराव्या लागतील, अशी चिंता व्यक्त केली होती.

आता फडणवीस सरकारकडे केवळ जलजीवन मिशनच नाही तर इतर विभागांतील ठेकेदारांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. सध्या सरकारकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे 46 हजार कोटी, जलसंपदा विभागाचे 19 हजार 700 कोटी, जलजीवन मिशनचे 18 हजार कोटी, नगरविकास विभागाचे 17 हजार कोटी, ग्रामविकास विभागाचे 8 हजार कोटी आणि इतरही विभागांचे पैसे मोठ्या प्रमाणात थकले आहेत.

थकलेल्या रक्कमेचा आकडा 90 हजार कोटींच्या वरती असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे यावरून कंत्राटदारांनी सरकारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या कंत्राटदार संघटनेने सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पण अजूनही सरकारकडून संघटनेला थांबा असेच उत्तर मिळाले आहे. थोडक्यात सरकारला ही देणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

CM Devendra Fadnavis | Maharashtra Government
Shivendraraje Bhosale : मंत्रिपदाचा आनंद विरला; शिवेंद्रराजेंच्या बंगल्यावर पैशांसाठी रांगा; 46 हजार कोटी देणे बाकी

शिवेंद्रराजे भोसले नाराज?

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या खात्याच्या दीड लाख ठेकेदारांची तब्बल 46 हजार कोटींची देणी थकबाकी आहे. हीच थकबाकी मिळावी यासाठी शिवेंद्रराजेकडे मंत्रालयात आणि बंगल्यावर देणेकऱ्यांची रांग लागल्याची माहिती मिळत आहे. या थकबाकीमुळे मंत्री शिवेंद्रराजेंना पुढील किमान साडेतीन ते चार वर्षे काहीही नवीन करता येणार नसल्याने ते नाराज झाले आहेत.

CM Devendra Fadnavis | Maharashtra Government
Harshal Patil Suicide : गुलाबराव पाटलांच्या विधानावर हर्षल पाटलांच्या भावाची प्रतिक्रिया; ‘माझ्या तोंडून वाईटही येऊ शकतं. पण...’

लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण?

राज्यात सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक विभागाचा निधी वळवला जात आहे. यावरून विविध मंत्र्यांनी थेट नाराजी बोलून दाखवली आहे. विरोधकांसह सत्ताधारी ही लाडकी बहिणीमुळे तिजोरीवर लोड येत असल्याचे बोलत आहेत. याच लाडकी बहीण योजनेमुळे ठेकेदारांची देणी थकली असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com