Maharashtra Political Horoscope: भविष्यनामा! सत्ताधाऱ्यांसाठी 'कटकटी'चा काळ; मंगळाची 'वक्रदृष्टी'..!

Mahavikas Aaghadi Vs Mahayuti : सत्ताधारी आघाडीतील महत्त्वाचे नेते संधी न मिळण्याच्या शक्यतेमुळे विरोधी महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता राहील. याउलट सत्ताधारी महायुतीला सध्याचा काळ प्रतिकूल राहील. घटक मित्रपक्षांमध्ये टोकाचे मतभेद जाहीर होतील. अंतर्गत वाक््युद्ध महायुतीसाठी त्रासदायक राहील.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Mahavikas Aghadi Vs Mahayuti Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : 18 सप्टेंबर रोजी पौर्णिमा होत असून काही प्रदेशात चंद्रग्रहण होणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नाही. मात्र या ग्रहणाचा परिणाम दिसून येईल. पौर्णिमेच्या जवळपास मोठी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून दक्षिणेकडे पूरसदृश्‍य स्थिती निर्माण होईल. मीन राशीतील ग्रहणामुळे पूर/अतिवृष्टी संभवते. तसेच एखादी मोठी विमान/जहाज दुर्घटना संभवते. Politics In Maharashtra Horoscope

या योगामुळे अपहरण/आत्महत्या यांसारख्या घटना या काळात संभवतात. समुद्र किनारपट्टीवर मोठी वादळे/त्सुनामीसारख्या घटना शक्य असतील. या काळात राजकीय वातावरण गरमागरम राहील. पक्षांतराच्या घटना वाढतील. दशमातील मंगळामुळे हा काळ सत्ताधारी पक्षांसाठी कटकटीचा राहील. संप, बंद, आंदोलनामुळे मोठी तडजोड करावी लागेल. मोठ्या व्यक्तींचा मृत्यू या काळात संभवतो. सत्ताधारी-विरोधी नेत्यांमध्ये मोठे वादविवाद रंगतील.

या योगामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली दिसेल. टोळीयुद्ध, अपघात, खून, हाणामाऱ्या या घटना पौर्णिमेजवळ वाढलेल्या दिसतील. मोठ्या व्यक्तींवर प्राणघातक हल्ले किंवा घातपाताचे प्रयत्न होतील. मात्र, या काळात शुक्र स्वराशीत (तूळ) प्रवेश करीत आहे. यामुळे शेअर बाजारात तेजी राहील. सोन्या-चांदीचे भाव वाढतील.

देशाची आर्थिक स्थितीमध्ये मोठी सुधारणा होईल. रुपयाचे मूल्य वाढेल. सेलिब्रेटींचे विवाह, प्रेमप्रकरणे या काळात गाजतील. भाग्य स्थानातील गुरुमुळे गणेश उत्सव चांगल्या वातावरणात व उत्साहाने साजरा होईल. मोठे सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम गणेश मंडळाकडून राबविले जातील.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Anandrao Adsul News : माजी खासदार आनंदराव अडसूळ आता करणार दर्यापूर विधानसभा मतदारसंघावर दावा?

भाग्यातील गुरूमुळे मंदिरे व गणेश मंडळांकडे मोठ्या देणग्या जमा होतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळांना नेतेमंडळींकडून मोठी आर्थिक मदत मिळेल. विरोधी महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aaghadi) पोर्णिमा अनुकूल असून सध्याचे वातावरण विरोधी आघाडीसाठी पोषक राहील.

सत्ताधारी आघाडीतील महत्त्वाचे नेते संधी न मिळण्याच्या शक्यतेमुळे विरोधी महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता राहील. याउलट सत्ताधारी महायुतीला सध्याचा काळ प्रतिकूल राहील. घटक मित्रपक्षांमध्ये टोकाचे मतभेद जाहीर होतील. अंतर्गत वाक््युद्ध महायुतीसाठी त्रासदायक राहील. BJp Horoscope

शनि-बुध प्रतियोग षष्टस्थानातून होत असल्याने लेखक, प्रसारमाध्यमे, साहित्यिक यांच्यासाठी पौर्णिमा प्रतिकूल राहील. मोठे लेखक साहित्यिकांचे मृत्यू संभवतात. या क्षेत्रातील व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता राहील.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Raj Thackeray on Ajit Ranade : ''अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का ?''

वृद्ध व लहान मुलांसाठी हा काळ प्रतिकूल असून साथीचे विकार, श्‍वसनाचे विकार या काळात त्रासदायक ठरतील. षष्टातील शनीमुळे ज्येष्ठ राजकीय व्यक्तींना आजारपण किंवा कायदेशीर कटकटीचा सामना करावा लागेल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण भारतीय जनता पक्षाच्या पत्रिकेचा विचार करू.

6 एप्रिल 1980 च्या भाजप (BJP) स्थापना पत्रिकेत रवी दशमात मीन राशीत असून चंद्र षष्टात हर्षल, नेपच्यून, केतू बरोबर आहे. तर तृतीय शनी, मंगळ, गुरू, राहू अशी ग्रहस्थिती आहे. 2014 व 2019 च्या निवडणुकीत गुरूच्या अनकुल भ्रमणामुळे मोठे यश मिळाले होते. मात्र 2024 मध्ये व्ययस्थानातील गुरूभ्रमण व रवीवरून होणारे राहूचे भ्रमण प्रतिकूल असल्यामुळे पक्षाला एकहाती सत्ता मिळविता आली नाही. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात मोठा फटका पक्षाला मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Ex.Mp Hemant Patil News : खासदारकीची तहान हळद केंद्राचे अध्यक्षपद देऊन भागवली

गुरू, राहू, शनीचे प्रतिकूल गोचर भ्रमण या काळात सुद्धा प्रतिकूल राहणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेना यांना तिकीट वाटपात योग्य वाटा द्यावा लागणार आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत कमी जागावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे सहाजिकच 105 जागा तेवढीच संख्या टिकवणे अवघड राहणार आहे. घटक पक्षांना झुकते माप जागावाटपात द्यावे लागणार आहे. त्यामुळे नाराज इच्छुक उमेदवार विरोधी आघाडीकडे जाण्याची शक्यता राहील. Maharashtra Ajit Pawar NCP Horoscope

सध्या महायुतीकडे 200 च्या जवळपास आमदार आहेत. एवढ्या जागा पुन्हा मिळणे शक्य नसल्यामुळे तरी 150 पेक्षा अधिक जागा मिळवणे हे प्रमुख लक्ष राहील. मित्रपक्ष व इतर घटक पक्ष, अपक्ष यांना जागा वाटपात योग्य वाटा देताना पक्षाच्या जागा टिकवण्यामध्ये नेतृत्वाची दमछाक होवू शकते. नाराज कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांना थोपविणे कठीण जावू शकते. स्वतच्या जागेबरोबर मित्रपक्षांच्या जागा टिकण्यामध्ये पक्षाला मोठी ताकद लावावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकामुळे विरोधी महाविकास आघाडीचा वाढलेला आत्मविश्वास व मिळणारा प्रतिसाद रोखण्यासाठी घटक पक्षांची एकजूट व प्रचाराचे नियोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत तसेच लाडकी बहीण योजनेसारख्या घोषणांचा प्रचार याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर केला तरच पक्षाला सन्मानजनक जागा मिळू शकतील. सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. यश सोपे नाही.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Sanjaykaka Patil : अपरिपक्व माणूस म्हणत विशाल पाटलांच्या ‘त्या’ विधानांचा संजयकाकांनी घेतला समाचार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com