Maharashtra Politics : सामंतांना शिंदेंच्या काळ्या दाढीपेक्षा मोदींच्या पांढऱ्या दाढीचेच कौतुक!

Maharashtra Politics एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पांढऱ्या दाढीचे कौतुक केले आहे. चार जूननंतर पुन्हा पांढरी दाढी सत्तेत येणार आहे, त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका, असे ते म्हणाले आहेत. याबाबत त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Maharashtra Politics Narendra Modi- Ekanath Shinde- Uday Samant
Maharashtra Politics Narendra Modi- Ekanath Shinde- Uday SamantSarkarnama

हल्ली राजकीय नेते काय बोलतील याचा नेम राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सत्ताधाऱ्यांना आता विरोधक आणि जनतेच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. अशातच राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाणीटंचाईने नागरिक हैराण होत आहेत आणि प्रश्न निवडणुकीत Lok Sabha Election राजकीय नेत्यांच्या नाकीनऊ आणणार आहे.

अशी परिस्थिती असताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना भलत्याच गोष्टीचे कौतुक वाटू लागले आहे. तसे नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. Maharashtra Politics Uday Ekanath Shinde Faction Leader Samant Praising Narendra Modi

एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी, एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकीय पक्ष, नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. उदय सामंत हे सत्ताधारी महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आहेत. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची साथ सोडून ते शिंदे यांच्यासोबत सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे अर्थातच त्यांच्यावर महाशक्तीचा वरदहस्त आहे.

शिवसेना शिंदे गटात एकनाथ शिंदे Ekanath Shinde यांच्यानंतर आपणच आहोत, हे दाखवून देण्याची एकही संधी सामंत Uday Samantसोडत नाहीत. काळ्या दाढीचे एकनाथ शिंदे त्यांचे नेते असतानाही आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या पांढऱ्या दाढीचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

देशामध्ये पांढऱ्या दाढीला महत्व आहे. चार जूननंतर पांढरी दाढी पुन्हा तिकडे बसणार आहे. त्यामुळे भूलथापांना बळी पडून नका. काहीजण तुतारी वाजवतील, काहीजण मशाल घेऊन धावतील, काही लोक अजून काहीतरी करतील.., मात्र काहीही परिणाम होणार नाही. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे.....असे उद्योगमंत्री सावंत म्हणत आहेत.

हे देखिल वाचा -

Maharashtra Politics Narendra Modi- Ekanath Shinde- Uday Samant
Dhangekar Vs Murlidhar: त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडे वस्ताद; धंगेकरांचा मोहळांना धोबीपछाड

याद्वारे त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress आणि शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पांढऱ्या दाढीचा उल्लेख अभिमानाने केला आहे. सामंत यांची दाढी पांढरी आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचेही कौतुक स्वतःच करून घेतले आहे.

सामंत यांच्या पक्षाचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाढी आहे, पण ती काळी आहे. पांढऱ्या दाढीचे कौतुक करत असताना सावंत यांनी काळ्या दाढीचा साधा उल्लेखही केलेला नाही.

मंत्री सामंत यांच्या या व्हिडीओखाली आणि व्हायरल पोस्टखाली पडलेल्या बहुतांश कमेंट्स या त्यांच्यावर टीका करणाऱ्याच आहेत. गेल्या दहा वर्षांपासून भूलथापाच सुरू आहेत, ते कोण मारत आहे, असा प्रश्न एका यूजरने सामंत यांना विचारला आहे.

राजकीय नेत्यांच्या पोस्टवर अशा कमेंटस पडणे यात आता नावीन्य राहिलेले नाही. नेत्यांच्या पोस्ट व्हायरल झाल्या की त्या खाली लोक अक्षरशः तुटून पडतात.

उदय सामंत यांच्या या पोस्टचेही असेच झाले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागात लोकांचे हाल सुरू आहेत. चारा, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थित एक मंत्री पांढऱ्या दाढीचे नॅरेटिव्ह सेट करत आहेत.

राजकीय नेत्यांच्या कोणत्या गोष्टीचे लोकांना कौतुक वाटेल, याचाही नेम राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जातात आणि नागरिकांच्या मूळ प्रश्नांवर नॅरेटिव्ह सेट न होता तो भलत्याच गोष्टींवर सेट होऊ लागला आहे.

हे देखिल वाचा -

Maharashtra Politics Narendra Modi- Ekanath Shinde- Uday Samant
Sangola Politics : आणखी एका पुतण्याचं काकांविरोधात बंड; शहाजीबापूंचा पुतण्या जाणार शरद पवारांसोबत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com