Mahayuti Updates : महायुतीची सत्तास्थापनेची चर्चा 'या' कारणामुळे लांबणीवर; दोन दिवसांचा लागला ब्रेक

Political News : शुक्रवारी मुंबईत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक होऊन सत्तास्थापनेचे सूत्र ठरणार होते. मात्र, एकनाथ शिंदे नाराज असल्याने सातारा जिल्ह्यातील दरे गावी जाणार असल्याने सत्तास्थापनेची चर्चा लांबणीवर पडल्याची चर्चा असतानाच या मागचे नेमके कारण पुढे आले आहे.
Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. 288 पैकी तब्बल 237 जागांवर महायुतीने विजय प्राप्त केला. त्यामुळे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या मध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा होऊन फॉर्म्युला जवळपास फायनल झाला. या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारी मुंबईत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक होऊन सत्तास्थापनेचे सूत्र ठरणार होते. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने सातारा जिल्ह्यातील दरे गावी जाणार असल्याने सत्तास्थापनेची चर्चा लांबणीवर पडल्याची चर्चा असतानाच या मागचे नेमके कारण पुढे आले आहे. (Mahayuti Updates)

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीत मोठी चुरस पहावयास मिळाली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन गेल्या सहा दिवसापासून खल सुरू होता. त्यातच, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज झाल्याची माहिती पुढे आली होती.

बुधवारी शिंदे यांनी मोठी घोषणा करीत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला होता. त्या स्वरूपाची घोषणा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यांच्या या घोषणेने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री शाह यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या मध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा होऊन फॉर्म्युला जवळपास फायनल झाला.

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा पक्ष मराठवाड्याच्या राजधानीतून गायब, याला जबाबदार कोण ?

त्यानंतर शुक्रवारी मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदे, फडणवीस व पवार यांची बैतक होणार होती. मात्र, ही बैठक दोन दिवस लांबणीवर पडली आहे. त्यामुळे शपथविधीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. अमित शहा यांच्यासोबत दोन दिवसांनी दिल्लीत बैठक होणार असल्याचे समजते. गुरुवारी या दोघांची एक बैठक पार पडली होती. आता पुन्हा एकदा दिल्लीत दोन दिवसांनी एकनाथ शिंदे हे अमित शहा यांची भेट घेणार असून त्यांची बैठक पार पडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या दोन दिवसात मुंबईत बैठक होण्याची शक्यता कमी आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Bjp News : अहेरी विधानसभेत भाजप बॅकफूटवर; राष्ट्रवादीच्या एंट्रीने अस्तित्वच धोक्यात !

एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुरुवारच्या बैठकीवेळी एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये गृहमंत्री पदासह शिवसेनेला 12 कॅबिनेट व त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती पद हे महत्वाचं पद या प्रस्तावातून मागीतले गेले आहे. शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावावर आम्ही दोन दिवसात विचार करून कळवू असे अमित शहा आणि भाजपकडून सांगण्यात आले आहे. हा प्रस्ताव जर मान्य झाला नाही, तर दोन दिवसांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. भाजपच्या भूमिकेवर शिंदे यांचे समाधान झाले नाही, तर शिंदे पुन्हा दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री शाह यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Bjp News : 'बच्चू कडू विश्वासघातकी, त्यांना महायुतीत घेऊ नये'; भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं टाकला बॉम्ब

येत्या दोन दिवसात भाजपच्या आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी दिल्लीतून पक्ष निरीक्षक येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपचा विधिमंडळाचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबरच्या जवळपास महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. दुसरीकडे शनिवारी व रविवारी अमावास्या असल्याने या दोन दिवसात सत्तास्थापनेच्या दृष्टीने मोठ्या घडामोडी अथवा चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. या सर्व कारणामुळे राज्यातील सत्तास्थापनेची चर्चा लांबणीवर पडली असल्याचे समजते.

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Kolhapur Politics: आमचं निस्तरायला आमचा साहेब घट्ट हाय! बंटी पाटलांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com