Mahayuti Government : अजित पवार, फडणवीस यांच्यातील ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

CM Devendra Fadnavis and DCM Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे एकनाथ शिंदेंकडे असताना, त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकदा अजित पवार यांच्या पक्षाविषयी नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आले आहेत. त्यांच्या नेतृत्वात अजित पवार यांना काम करणे सोयीचे ठरणार आहे.
Ajit Pawar | Devendra Fadnavis
Ajit Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

पांडुरंग म्हस्के

Mumbai News: मुख्यमंत्रिपदाची सूत्रे एकनाथ शिंदेंकडे असताना, त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकदा अजित पवार यांच्या पक्षाविषयी नाराजी बोलून दाखवली होती. महायुतीत असूनही या दोन्ही पक्षांचे सूर जुळलेले दिसत नव्हते. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आले आहेत. त्यांच्या नेतृत्वात अजित पवार यांना काम करणे सोयीचे ठरणार आहे.

2019 च्या सकाळच्या शपथविधीपासूनच या दोघांचे समीकरण चांगले जुळलेले आहे. विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांची बदललेली देहबोली खूप काही सांगून जात होती. लोकसभेत पक्षाचा पार धुव्वा उडालेला असताना, या निवडणुकीत मिळालेले यश त्यांचा आणि पक्षाचा आत्मविश्वास वाढविणारेच आहे.

अजित पवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच लगेचच त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक लवादाने पवार यांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश रद्द केला आहे. त्यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांच्या शेकडो कोटींच्या मालमत्ता त्यामुळे त्यांना परत मिळणार आहेत. या निर्णयानंतर अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, हे सगळे राजकीय भूमिकेतून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. आता प्रश्न असा आहे की मुळात पवार यांना राजकीय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणी केलेला होता. विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फारकत घेत महायुतीला पाठिंबा देत सत्तेमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांना मिळालेला दिलासा हा सुद्धा राजकीयच आहे, जनतेला कुणी सांगण्याची आवश्यकता नाही.

फडणवीस सोयीस्कर

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेकदा मतभेद झाल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना अर्थमंत्री असलेले अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, असे सांगत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती.

त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारमधील मुख्यमंत्रिपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना अनेकदा शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्या पक्षाविषयी नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे महायुतीमध्ये असले तरी या दोन मित्रपक्षांचे सूर काही जुळलेले दिसत नव्हते. परंतु, नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणे अजित पवार यांना अधिक सोयीचे ठरणार आहे. कारण, 2019 मध्ये सकाळच्या शपथविधीपासूनच दोघांचे समीकरण चांगल्या प्रकारे जुळलेले आहे. एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह असताना व हा प्रश्न पत्रकार परिषदेत समोर आलेला असताना त्याला शिंदे उत्तर देत असताना मध्येच हस्तक्षेप करत अजित पवार यांनी घाईघाईने आपण मात्र उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करून टाकले होते.

सकाळच्या शपथविधीने सारे काही स्पष्ट

यामुळे कोणत्याही राजकीय अटी शर्ती न टाकता पवार हे सत्तेत सहभागी होणार असले, तरी त्यांना मिळणारा अप्रत्यक्ष फायदा वेगळाच असणार होता. तो त्यांना मालमत्ता जप्तीच्या आदेश रद्द होण्याच्या कृतीतून मिळाला आहे. विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत सहभागी झालेले अजित पवार हेच मुळी त्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे सत्तेत सहभागी झाले होते.

Ajit Pawar | Devendra Fadnavis
Mahayuti Politics : "थांबावं लागतं..."; मुनगंटीवार-भुजबळांच्या नाराजीवर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्यावर राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळ्याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर तसेच याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांत अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महासत्तेच्या सावलीत गेले होते. हे उघड सत्य आहे.

2019 मध्ये केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा संदर्भात नोटीस पाठवली होती. एकीकडे तपास यंत्रणांचा दबाव अजित पवार यांच्यावर वाढत असतानाच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किती दिवस राजकारण करायचे, याचे शल्य त्यांना होते.

Ajit Pawar | Devendra Fadnavis
Sanjay Raut : पुरंदरचे आमदार असो वा मुनगंटीवार...; महायुतीत नाराजीनाट्य अन् राऊतांनी अचूक टायमिंग साधलं

त्यामुळेच 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच काही आमदारांना सोबत घेऊन भाजपबरोबर हातमिळवणी करत सकाळचा शपथविधी उरकून घेतला होता. मात्र, यानंतर काही तासांतच अजित पवार यांना पाठिंबा देणारे सर्व आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतल्याने सरकारचे बहुमत कमी होऊन फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतरच्या वर्षभरातच अजित पवार यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये असलेले बंध किती घट्ट होते याची जाणीव राज्यातील जनतेला झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com