
Sangli News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल राजकारणात करेक्ट कार्यक्रम करणारा असे म्हटले जाते. आता याच बिरूदावलीवरून भाजप आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर जहरी टीका केली आहे. जयंत पाटील नीच अन् कपटी आहे. ते सगळ्यांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात पण आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम करू असे म्हणत पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते कवठेमहाकाळमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
जयंत पाटील टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असे लोक म्हणतात. पण ते कपटी असून कधीच समाधानी नसतात. यामुळेच ते टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात. पण आम्ही त्यांचा कार्यक्रम टप्प्यात आल्यावर नाही, तर टप्प्यात आणून करू, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.
'जतमध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केला. मात्र जतच्या लोकांना सगळं कळतंय. कोणाला घरी घालवायचे अन् कोणाला नाही ते. हे जयंत पाटलांनी सांगायची गरज नाही, असा देखील टोला पडळकर यांनी लगावला आहे.
तसेच जयंत पाटील आपल्याला किती विरोध करतोय, तो कपटी आणि नीच माणूस आहे. मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी देखील याने विरोध केला. निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला. तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा, अशी मागणी जयंत पाटलांनी केली होती असा दावा पडळकर यांनी केली.
दरम्यान आटपाडी येथे माणगंगा साखर कारखान्याच्या विक्रीवरून देखील पडळकर यांनी माणगंगा सभासदांच्या बाजूने राहण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी लढा लढणार असल्याचे संकेत दिले असून संचालक मंडळाची मालमत्ता विकून कारखान्याचे कर्ज भरून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी पडळकर यांनी, 'जिल्ह्यात कर्ज थकीत ठेवून कारखाना विक्रीला काढायचा आणि परत स्वतः घ्यायचा असा जयंत पाटील यांचा इस्लामपूर पॅटर्न दहा वर्षापासून सुरू आहे. जत आणि सर्वैदयचा कारखाना घेतला. महाकाली बंद पाडला, आटपाडी कारखाना विकत घेण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.