Arvind Sawant : मोदी नाही, ठाकरेंच्या चेहऱ्यावर जिंकले; अरविंद सावंतांना दलित, मुस्लिम मतदारांनी दिली साथ!

Arvind sawant Win Analysis uddhav Thackeray : अरविंद सावंत हे एक लाख मतांनी निवडून येतील, असा अंदाज होता. मात्र, यामिनी जाधव यांनी त्यांचे लीड कमी केले.
Arvind sawant Win Analysis uddhav Thackeray narendra modi
Arvind sawant Win Analysis uddhav Thackeray narendra modisarkarnama

Arvind Sawant News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंचे उमेदवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून येतात, अशी टीका भाजपमधून केली जात होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने दाखवून दिले की त्यांचे खासदार हे मोदींच्या नाही तर उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून येतात. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत हे त्याचेच उदाहरण. मुस्लिम, दलित मतांची मिळालेल्या साथीवर अरविंद सावंतांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा 50 हजारापेक्षा जास्त मतांनी ते विजयी झाले.

अरविंद सावंत Arvind Sawant हे एक लाख मतांनी निवडून येतील, असा अंदाज होता. मात्र, यामिनी जाधव यांनी त्यांचे लीड कमी केले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत यामिनी जाधव यांनी तीन हजाराचे लीड घेतले. मात्र, उरलेल्या 19 फेऱ्यांमध्ये सावंत यांनी यामिन जाधव यांना एकदाही पुढे जाण्याती संधी दिली नाही.

दहाव्या फेरीपर्यंत अरविंद सावंत यांचा विजय निश्‍चित झाला होता. सावंत यांनी मुस्लीम बहुल मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य घेतले. त्याखालोखाल वरळी, शिवडी या मतदारसंघात त्यांनी चागंली आघाडी घेतली. शिवाय यामिनी जाधव आमदार असलेल्या भायखळा मतदारसंघात अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांच्या बरोबरीने मतं घेतली.

मलबार हिल, कुलाबा या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे यामिनी जाधव यांना या मतदारसंघात आघाडी होती. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच लोकसभेत मोदींच्या विरोधात जावून निवडणूक लढल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील शिवसेनेची ताकद टिकवणे हे ठाकरेंच्या समोर मोठे आव्हान होते. मात्र,

Arvind sawant Win Analysis uddhav Thackeray narendra modi
Solapur First Women MP : आईची संधी थोडक्यात हुकली...पण लेकीने इतिहास घडविला; प्रणिती शिंदे बनल्या पहिल्या महिला खासदार!

कोणाला कीती मते

शिवसेना (ठाकरे गट) अरविंद सावंत - 3 लाख 95 हजार 655

शिवसेना (शिंदे गट ) यामिनी जाधव - 3 लाख 42 हजार 982

मताधिक्य - 52 हजार 673

(Edited By Roshan More)

Arvind sawant Win Analysis uddhav Thackeray narendra modi
Mumbai Lok Sabha Election Results : धक्कादायक बातमी : ठाकरेंच्या किल्ल्यात लाखभर बांग्लादेशी; सोमय्यांनी फोडला बॉम्ब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com