Nagpur District and Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत ५२ हजारांनी भर पडली आहे. आणखी ६८ हजार मतदारांची एक यादी तयार असून ती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पदाधिकाऱ्यांनी सुमारे पावणे दोन लाख मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली असल्याचा दावा केला होता.
मतदानाच्या घसरलेल्या टक्क्याला प्रशासनालाचा जबाबदार ठरवले होते. हे लक्षात घेऊन १३६ मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असल्याने विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha Election) आता मतदानाची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षावर आली आहे.
नागपूर(Nagpur) जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम रबवला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नागपूर जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ४२ लाख ७२ हजार होती. त्यात वाढ होऊन ती आता ४३ लाख २४ हजार १८६ झाली आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी मतदारांच्या संख्येत ५२ हजाराने वाढ झाली आहे. यावर २० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३० ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी मतदान केंद्राचेही सुसूत्रीकरण करून १३६ केंद्रांची आणखी वाढ केली आहे. मतदान केंद्राची संख्या आता ४ हजार ६१० इतकी करण्यात आली आहे. उंच इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ११ तर झोपडपट्टी परिसरात ९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर लागलेल्या रांगामुळेही मतदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी रोष व्यक्त केला होता.
अनेकांना मतदानासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागले होते. काहींनी रांगा बघून मतदानच केले नाही. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर होते. काहींची मतदान केंद्र परस्पर बदलले तर घराजवळचे मतदान केंद्र सोडून लांबच्या मतदान केंद्रात नावे टाकल्याचाही आरोप होता. त्यामुळे मतदानचा टक्का घसरल्याचा आक्षेप होता. आता जिल्हाधिकारी यांनी मोठी लोकसंख्या असलेल्या सोसायट्या व उंच इमारतीजवळच मतदानाची व्यवस्था केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.