BJP
BJPSarkarnama

Nitin Gadakri News : भाजपच्याच कार्यकर्त्यांनी रोखले गडकरींच्या काँक्रिट रोडचे काम; रस्त्याच्या उंचीमुळे असंतोष

Political News : सिमेंट रोडच्या उंचीमुळे हे घडत असल्याने मोठा असंतोष शहरात निर्माण झाला आहे. आता भाजपचे आमदार आणि कार्यकर्तेसुद्धा या रस्त्यांना विरोध दर्शवू लागले आहेत.
Published on

Nagpur News : पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची मोठी समस्या जाणवू लागली आहे. सिमेंट रोडच्या उंचीमुळे हे घडत असल्याने मोठा असंतोष शहरात निर्माण झाला आहे. आता भाजपचे आमदार आणि कार्यकर्तेसुद्धा या रस्त्यांना विरोध दर्शवू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चिम नागपूरमधील त्रिमूर्तीनगरातील सिमेंट रोडचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakri) यांनी संपूर्ण शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा झपाटा लावला आहे. पूर्वी वर्दळीचे व मोठे रस्तेच काँक्रिटचे करणार होते. आता गल्लोगल्ली सिमेंटचे रोड निर्माण केले जात आहेत. सिमेंट रोडची उंची जवळपास एक ते दीड फूट असल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरू लागले आहे. (Nitin Gadakri News)

महापालिका आयुक्तांनीसुद्धा अलीकडे सिमेंटरोडच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. यापुढे सिमेंट रोडचे काम करताना त्याची उंची वाढणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल असे त्यांचे म्हणणे आहे. आमचा विरोध सिमेंट रोडला त्याच्या उंचीला आणि कंत्राटदारामार्फत केल्या जात असलेल्या थातूरमातूर कामांना असल्याचे भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीत शहरातील शेकडो वस्त्या आणि घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पूरपरिस्थिती रोखण्यासाठी मोठी घोषणा केली होती. शहरातील नदीनाल्यांचे खोलीकरण, नदीनाल्यांच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणाचा सफाया, पाण्याचा प्रवाह मोकळा करणे, अशा काही उपाययोजना त्यानुसार सुरू करण्यात आल्या आहेत.

BJP
Vishalgad Riot Case : विशाळगड हिंसाचार प्रकरण: 17 जणांना जामीन; तर सात जणांचा फेटाळला

यावर्षीसुद्धा अतिवृष्टीत अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. जागोजागी सुरू असलेले सिमेंट रोडचे काम, उंच झालेले सिमेंट रोड, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रोडच्या शेजारी नसलेल्या नाल्या यामुळे अर्धे नागपूर बुडाले होते. काही नगरसेवकांनी सिमेंट रोड फोडले. शहरात जवळपास सत्तर टक्के रस्ते सिमेंटचे झाले आहेत. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या कायमची राहणार आहे.

भाजपच्या अधिवेशनात गडकरी यांनी आमदार आणि नगरसेवकांनाच यावर उपाय शोधण्यास सांगितला आहे. तुम्ही काय करता, काही विचार केला का, यावर उपाययोजना सुचवल्या का ? अशी गडकरी यांनी भाजपच्या माजी नगरसेवक विचारणा केली. त्यावेळी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याकडे याचे उत्तर नव्हते. मात्र, त्रिमूर्तीनगरातील सिमेंट रोडचे काम रोखून भाजपच्या कार्यकर्त्यांना या समस्येचे उत्तर सापडल्याचे दिसून येते.

BJP
Gayatri Shingne : डॉ. राजेंद्र शिंगणेंनी माघार घेऊन विधानसभेला मला पाठिंबा द्यावा; अन्यथा...; पुतणीने दिले चॅलेंज!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com