PM Modi Solapur Visit : देशवासियांनो, २२ जानेवारीला सायंकाळी रामज्योती प्रज्वलित करा; मोदींचे आवाहन

RAY Nagar News : मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘पंढरपूरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराजांना मी नमस्कार करतो,’ अशी मराठीतून केली.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्रातील नाशिकच्या पंचवटीतूनच झाली आहे. रामभक्तींच्या वातावरणात महाराष्ट्रातील एक लाखापेक्षा जास्त परिवारांचा गृहप्रवेश होत आहे, त्यामुळे मला आज अत्यानंद झाला आहे. हे सर्वजण येत्या २२ जानेवारी रोजी सायंकाळी ‘रामज्योती’ प्रज्वलित करतील. देशातील सर्व जनता येत्या २२ जानेवारी रोजी सायंकाळी रामज्योती प्रज्वलित करेल, अशी मला आशा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला येत्या २२ जानेवारी रोजी रामज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. (Light the Ram Jyoti in the evening on January 22 : Modi's appeal)

सोलापूर येथील कुंभारीच्या रे नगर येथे असंघटित कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पाच कामगारांना मोदी यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Modi Solapur Tour : कामगारांना घरे देताना मोदी बालपणीच्या आठवणीने भावूक; सोलापुरात रडले....

मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘पंढरपूरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराजांना मी नमस्कार करतो,’ अशी मराठीतून केली. तंबूतील श्री रामाचे दर्शन घेण्याची परपंरा खंडित करण्याचा आम्ही संकल्प केला होता. त्यानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले असून येत्या २२ जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केली.

ते म्हणाले की, येत्या २२ जानेवारी रोजी संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण येणार आहे. अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेपूर्वी मी संतांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्ठान करत आहेत. त्याचे मोठ्या कठोरपणे मी पालन करत आहे. आपल्या सर्वांच्या आशीवार्दामुळे या अकरा दिवसांत हे अनुष्ठान करत आहे. त्यात काही कमी राहू नये, यासाठी काळजी घेत आहे

Narendra Modi
RAY Nagar Program : आडम मास्तरांनी मोदींसमोरच उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com