Ladki Bahin Yojana : राजकीय पक्षांना सापडला विजयाचा नवा फॉर्म्युला; 'लाडक्या बहिणी'मुळे आले एका वर्षात 8 राज्यात सरकार

Political Parties Gain from Ladki Bahin Scheme : 2023-24 या वर्षभरात निवडणूक झालेल्या नऊ पैकी आठ राज्यात ही लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली आहे. या योजनेमुळे राजकीय पक्षांना आता निवडणुकीत विजयाचा फॉर्म्युलाच सापडला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या वर्षभराच्या काळात लाडकी बहीण योजना सर्वत्र गेमचेंजर ठरली आहे. या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक झालेल्या नऊ राज्यांपैकी महाराष्ट्रासह आठ राज्यात सत्ता आली आहे. या योजनेचा सहा राज्यात भाजप व मित्रपक्षाला फायदा झाला. तर दोन राज्यात काँग्रेस व इतर पक्षांना विजय मिळवता आला आहे.

2023-24 या वर्षभरात निवडणूक झालेल्या नऊ पैकी आठ राज्यात ही लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली आहे. या योजनेमुळे राजकीय पक्षांना आता निवडणुकीत विजयाचा फॉर्म्युलाच सापडला आहे.

कोरोना महामारीनंतर देशभरातील कुटुंबांची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचे पुढे आले आहे. केंद्र सरकार सुमारे 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन देत आहे. तर दुसरीकडे विविध योजनेच्या माध्यमातून मदत करीत आहे. देशातील जनतेची आर्थिक अडचण ओळखून भाजपने गेल्या काही दिवसापासून निवडणुकीची रणनीती बदलली असल्याचे पुढे आले आहे. प्रत्येक राज्यातील 'महिला व्होट बँक' ओळखत विरोधी पक्षांचा पराभव त्यांनी विधानसभा निवडणुकीत केला.

Ladki Bahin Yojana
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

गेल्या वर्षभरात ज्या 9 राज्यांमध्ये 'लाडकी बहीण' योजना यशस्वी ठरली आहे. त्यापैकी सहा राज्यांमध्ये भाजप (BJP) किंवा एनडीएला त्याचा फायदा झाला. तर झारखंडमध्ये सोरेन सरकारवर महिलांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला तर तेलंगणामध्ये या योजनेचा काँग्रेसला फायदा झाला. राजस्थानमध्ये काँग्रेसने (Congress) आश्वासन दिले होते. मात्र, महिलांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.

2023-24 या वर्षभरात निवडणूक झालेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व ओरिसा, आंध्रप्रदेश, हरियाणा या सहा राज्यात भाजप व मित्र पक्षाला फायदा झाला. त्यासोबतच तेलंगणातही याच काळात निवडणूक झाली त्यातही काँग्रेसने महालक्ष्मी योजना आणली होती. तेलंगणात प्रत्येक कुटुंबाला 2500 रुपये आणि पाचशे रुपयाला गॅस सिलेंडर देण्याची योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. त्याचा फायदा त्याठिकाणी काँग्रेसला झाला.

Ladki Bahin Yojana
Shivsena Politics : तब्बल चारवेळा सत्तेत, चार मुख्यमंत्री पण गृहमंत्रिपदाचा शिवसेनेला चकवा! यंदा काय होणार?

महाराष्ट्रात महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत सुमारे सव्वा दोन कोटी महिलांना मदत केली. महिलांच्या खात्यावर जवळपास 7 हजार 500 रुपये जमा झाले आहेत. महायुतीने या विधानसभा निवडणुकीनंतर 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सर्वांचे या घोषणेकडे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ambegaon Politic's : ज्यांनी वळसे पाटलांचा फोटो देव्हाऱ्यात ठेवला; तेच आज त्यांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत का? पूर्वा वळसेंचा भावूक सवाल

महाराष्ट्रात महायुतीला झाला फायदा

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती आघाडीला केवळ 37 टक्के जागा जिंकता आल्या. राज्यात 28 जून 2024 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. राज्य सरकारने यासाठी 46 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

महाराष्ट्रातील जवळपास 2.34 कोटी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत. जुलै 2024 पासून एकूण पाच हप्ते आले आहेत. या योजनेचा मोठा फायदा राज्यात महायुतीला झाला आहे. 288 पैकी महायुतीने 232 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला 46 जागा जिंकता आल्या. हा चमत्कार केवळ लाडकी बहीण योजनेमुळे घडला आहे.

Ladki Bahin Yojana
Pune Crime News : शिंदेसेनेतील माजी उपसरपंचांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू....

झारखंडमध्ये सोरेन सरकारवर पुन्हा विश्वास

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने 'मंइयां सम्मान योजना' सुरू केली होती. याअंतर्गत 21 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याचे वचन दिले होते. त्यानंतर भाजपने अधिक देण्याचे आश्वासन देऊन ही योजना खंडित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु महिलांच्या खात्यात चार हप्ते आधीच जमा झाले होते. आदिवासी महिलांना दरमहा हजारो रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागल्यावर त्यांचा सरकारवरील विश्वास वाढला. त्यामुळे या निवडणुकीत त्या जोरावर विजय मिळवत आला.

Ladki Bahin Yojana
Pune Congress : काँग्रेसमधील गटबाजी काही थांबेना! निवडणुकीनंतर पुण्यात नव्या वादाला तोंड फुटलं...

राजस्थानमध्ये काँग्रेसचा झाला पराभव

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी, गृह लक्ष्मी गॅरंटी अंतर्गत कुटुंबाच्या महिला प्रमुखाला वर्षाला 10,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने या आश्वासनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे पोहोचू शकले नाहीत. अशोक गेहलोत यांच्या आश्वासनाच्या विरोधात, भाजपने महिला आणि मुलींशी संबंधित तीन मुख्य योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली नाही, राज्यात काँग्रेसचे सरकार पडले.

Ladki Bahin Yojana
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून केंद्रीय मंत्र्यावर आरोप; निवडणुकीत काम न केल्याचा ठपका

मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना ठरली गेमचेंजर

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू केली. निवडणुकीपूर्वी राज्यातील लाडक्या भगिनींच्या खात्यावर एकूण 6 हप्ते पोहोचले होते.या योजनेवर मध्य प्रदेश सरकार दरवर्षी 19 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केले. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात विक्रमी 76 टक्के महिलांनी मतदान केले.

2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 31 लाख अधिक महिलांनी मतदान केले. भाजपला मिळालेली मते काँग्रेसपेक्षा 10 टक्के जास्त आहेत.15 वर्षे सत्ताविरोधी वातावरण असतानाही मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाचे श्रेय लाडली बहना योजनेला जाते.

वर्षभरात निवडणुका झालेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व ओरिसा, आंध्रप्रदेश, हरियाणा या सहा राज्यात भाजप व मित्र पक्षाला लाडकी बहीण योजनेमुळे विजय साकारता आला तर तेलंगणात काँग्रेसला व झारखंडमध्ये सोरेन सरकारला यश मिळाले आहे.

Ladki Bahin Yojana
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com