Pune ZP : राष्ट्रवादीच्या 5 आमदारांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नाकारले? खलाटे, खुटवड, इंगवलेंची संधी हुकली

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंडचे वीरधवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026
Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026Sarkarnama
Published on
Updated on

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंडच्या वीरधवल जगदाळे यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्ष म्हणून विवेक वळसे पाटील (आंबेगाव) यांना संधी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नावांवर शिक्कामोर्तब करताच दुपारी दोन वाजता या दोन्ही नेत्यांची औपचारिक निवड प्रक्रिया पार पडली.

वीरधवल जगदाळे यांच्या निवडीनंतर जिल्ह्यातील इतर दिग्गज नेत्यांच्या अध्यक्षपदाची संधी हुकली आहे. अध्यक्षपदासाठी बारामती तालुक्यातून करण खलाटे, मुळशीतून ज्येष्ठ सदस्य शांताराम इंगवले, भोरमधून विक्रम खुटवड यांचे नाव आघाडीवर होते. पण या नावांसाठी स्थानिक आमदारांनीच अध्यक्षपदासाठी जास्त जोर लावला नसल्याचे बोलले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही आमदारांना आपल्या मतदारसंघांत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद येऊ नये असे वाटत होते. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्यास तो नेता आपल्यासाठी भविष्यात स्पर्धक ठरू शकतो, याच भीतीने आमदारांनी आपल्या सदस्यांना पद घेण्याकरता फारसे स्वारस दाखवलेले नाही.

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुक्याकडे अध्यक्षपद न घेता गटनेता पद घेतले. दोनवेळा निवडून आलेल्या श्रीमंत ढोले यांची गटनेतेपदी निवड केली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणले आहेत. निकालानंतर सुरुवातीला त्यांनी अध्यक्षपद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली.

Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026
Pune ZP Vice President : वळसे पाटलांचं नाव अध्यक्षपदासाठी ठरलंच होतं पण, शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : उपाध्यक्षपदावरील एन्ट्रीची Inside Story

मावळला यापूर्वी अध्यक्षपद मिळालेले नाही, त्यामुळे अध्यक्षपद मावळला जाऊ शकते अशी चर्चा झाली. पण शेळके यांनी फारसा जोर लावला नसल्याचे आजच्या निवडीनंतर दिसून आले. भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनीही अध्यक्षपदासाठी फारशी 'शक्ती' खर्च केली नाही.

ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील तब्येतीमुळे यावेळी मंत्रीपदापासून लांब राहिले आहेत. त्यामुळे अध्यक्षपद आंबेगाव तालुक्याला दिले जाऊ शकते अशी शक्यता होती. दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी यापूर्वीही उपाध्यक्षपदी काम केले आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना अध्यक्षपद मिळू शकते, अशी चर्चा जिल्ह्यात होती.

Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026
Pune ZP : आजोबानंतर नातूही त्याच खुर्चीत बसणार; विवेक वळसे पाटील दुसऱ्यांदा पुणे झेडपीचे उपाध्यक्ष

उपाध्यक्षपदावर समाधान :

पण आजच्या निवडीनंतर एकाही आमदाराच्या मतदारसंघात अध्यक्षपद देण्यात आले नाही हे स्पष्ट झाले. सर्वानुमते दौंड तालुक्याला अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला. यानंतर मांडेकर यांनी इंगवले यांच्यासाठी, हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकिताला उपाध्यक्ष पद मिळावं यासाठी फिल्डिंग लावली.

उपाध्यक्षपदाबाबत सकाळी मुंबईमध्ये बैठक झाल्याचे सांगितले जाते. या बैठकीत विवेक वळसे पाटील यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्याने उपाध्यक्षपद आंबेगावला देण्याबाबत निर्णय झाला. सुरुवातीला हे पद विष्णू हिंगे यांच्या पदरात पडेल असे वाटत होते. पण सलग दुसऱ्यांदा हे पद विवेक वळसे पाटील यांच्या पदरात पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com