Mahadev Jankar : महादेव जानकरांचे नवे राजकीय सीमोल्लंघन फसले; प्रमुख नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने समर्थकांची घोर निराशा

Maharashtra Political News : महादेव जानकर यांनी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांना निमंत्रित केले होते. या तीन नेत्यांनी अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमाला येण्याचे कबूल केले होते.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 01 June : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचे निमित्त साधून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी नव्या राजकीय सीमोल्लंघनाची जोरदार तयारी केली होती. त्यासाठी जानकरांनी देशाच्या राजधानीची निवड केली होती. मात्र, प्रमुख नेत्यांनीच जानकरांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने जानकरांच्या नव्या राजकीय इनिंगचे मनसुबे तूर्तास तरी धुळीस मिळाले आहेत. जानकरांनी कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमवली होती.

महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना निमंत्रित केले होते. या तीन नेत्यांनी अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमाला येण्याचे कबूल केले होते.

देशाच्या राजकारणातील प्रमुख तीन नेते कार्यक्रमाला येणार असल्याने दिल्लीतील (Delhi) तालकटोरा स्टेडियममध्ये देशभरातून आलेल्या रासपचे कार्यकर्ते आणि दिल्लीतील नागरिकांनी गर्दी केली हेाती. स्टेडियमध्ये राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादव आणि इतर नेत्यांचे बॅनर आणि पोस्टर मोठ्या संख्येने लावले होते. कार्यक्रमाची पूर्वप्रसिद्धी झाल्याने स्टेडियमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.

देशाच्या राजधानीत गर्दी जमवून महादेव जानकर यांनी अर्धी लढाई जिंकली होती. मात्र, प्रमुख नेतेमंडळींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने महादेव जानकर यांच्यासह रासपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची घोर निराशा झाली. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून जानकरांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली होती. मात्र, जानकरांचा तो फ्लॉप शो ठरला.

Mahadev Jankar
Prithviraj Chavan : भाजपबाबत पृथ्वीराजबाबांनी केले मोठे भाकीत; म्हणाले, ‘सत्तेच्या जीवावरील भाजप फार काळ...’

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे दिल्लीतील कार्यक्रमाला जाणार नाहीत, हे दिवसभरातील घडामोडीमुळे स्पष्ट झाले होते. मात्र, महादेव जानकर यांची भिस्त प्रामुख्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर होती. ते कार्यक्रमाला येतील, असे जानकरांना शेवटपर्यंत वाटत होते. मात्र, तब्येत बरी नसल्यामुळे राहुल गांधी हे तालकटोरा स्टेडियमधील जानकरांच्या कार्यक्रमास गेले नाहीत, असे सांगण्यात आले.

माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादवांना निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधान करत महादेव जानकर यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याबाबतची घोषणा त्यांनी थेट दिल्लीतून केली आहे.

Mahadev Jankar
Modi Solapur Tour : मोदींना सोलापुरात आणण्याची जबाबदारी जयकुमार गोरेंनी सोपवली चंद्रकांत पाटलांवर....

जानकरांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष

अहिल्यादेवी होळकर जयंतीनंतर राहुल गांधी, शरद पवार यांच्याकडून इंडिया आघाडीच्या प्रवेशाची ऑफर आली तर आघाडी करता येईल. मी महायुती, एनडीएसोबत नाही, त्यामुळे आघाडीबाबत कोणताही प्रॉब्लेम नाही. मी आता नवीन घरोबा करण्याचा प्रयत्न करतोय. पुढून त्यांचा किती प्रतिसाद येतोय, त्यावर पुढील गोष्टी ठरवल्या जातील, असे सांगून महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, राहुल गांधींसह सर्वच नेत्यांनी जानकरांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने आता जानकर काय निर्णय घेणार,याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com