Sangli Lok Sabha Constituency : प्रचाराचा 'पॉवर प्ले' जोशात !

The ruling BJP has a large system in the Sangli constituency : सत्ताधारी भाजपकडे सांगली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात यंत्रणा आहे, शिस्तबद्ध अशी ओळख असलेल्या भाजपची बूथ यंत्रणा सक्षम आहे.
Sangli Lok Sabha chandrhar patil, Vishal Patil, Sanjay patil
Sangli Lok Sabha chandrhar patil, Vishal Patil, Sanjay patilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पॉवर प्ले संपला आहे.अर्ज दाखल करण्यापर्यंतच्या या पॉवर प्लेमध्ये तिन्ही प्रमुख उमेदवारांनी जोशात सुरुवात केली आहे.पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय नेत्यांनी येऊन प्रचाराची रणदुंदुभी फुंकली आहे.लोकसभा निवडणूकीसाठी सांगली मतदारसंघातील निवडणुकीच्या रणांगणात २० उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे संजयकाका पाटील, बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात होणार आहे.

सध्या आयपीएल क्रिकेट लीगचा हंगाम जोरात सुरू आहे. तेथे पहिल्या सहा षटकांच्या पावर प्ले मध्ये प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला चढवण्याचे काम होते. निवडणूक प्रचाराचा पावर प्ले असाच आरोप प्रत्यारोप आणि शक्तिप्रदर्शनाने गाजला.सत्ताधारी महायुतीचे उमेदवार भाजपचे खासदार संजय पाटील यांची पहिल्याच टप्प्यात भाजपकडून उमेदवार जाहीर झाली होती. परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या घोळात संजयकाकांसमोर कोण उतरणार हेच स्पष्ट होत नव्हते. दरम्यान, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून पावर प्लेची जोशात सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangli Lok Sabha chandrhar patil, Vishal Patil, Sanjay patil
Sharad Pawar Vs Ajit Pawar: जागावाटपाच्या वाटाघाटीत 'दादां'पेक्षा 'साहेबां'चाच दरारा!

विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतरही विशाल पाटील उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील होतेच.मात्र त्याला यश येत नाही असे लक्षात येतात विशाल पाटील यांनी आपल्या पॉवर प्लेची सुरुवात बंडखोरी जाहीर करून केली. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह विशाल पाटील यांच्या मेळाव्यात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे तसेच काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी त्यांना थेट पाठिंबा जाहीर करून त्यांच्या बंडखोरीला ताकद दिली आहे. त्यामुळे विशाल पाटलांचा पॉवर प्ले ही जोशात झाला आहे.

महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजितदादा पवार हे दोन राज्यातील ताकदवर उपमुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने त्यांनीही जोरदार सुरुवात केली आहे. तर चंद्रहार पाटील यांच्या मेळाव्यास तसेच अर्ज दाखल करण्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सुमनताई पाटील, अरुण लाड आणि विक्रम सावंत हे तीन आमदारही उपस्थित होते.या तीनही उमेदवारांनी प्रचाराचा पॉवर प्ले तरी गाजवला आहे.आता खरी कसोटी आहे ती हाच जोश मतदानापर्यंत राखण्याची.

Sangli Lok Sabha chandrhar patil, Vishal Patil, Sanjay patil
Amravati Loksabha Election 2024 : अमरावतीत हुकूमशाहीचा 'उदय'; लोकशाहीची 'हार'?

सत्ताधारी भाजपकडे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात यंत्रणा आहे. शिस्तबद्ध अशी ओळख असलेल्या भाजपची बूथ यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराची गती कायम ठेवले आहे त्यांच्या जनतेला मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade), आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेत्यांची, कार्यकर्त्यांची जिल्ह्यातील फौज आहे. तुलनेत बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडेही मतदारसंघात कार्यकर्त्यांची तळागाळापर्यंत फळी आहे. मात्र ती दादा घराण्याशी संबंधित आणि काँग्रेसशी निगडित असणारी आहे. त्यांना आपली भूमिका पटवून देऊन नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Sangli Lok Sabha chandrhar patil, Vishal Patil, Sanjay patil
Sunetra Pawar News : माझ्या बायकोला निवडून दिले तर, माझा तुम्हाला फायदा होणार !

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे राजकीय आखाड्यात तसे नवखे असले तरी त्यांच्या पाठीशी शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष आहेत. काँग्रेसही महाविकास आघाडीचा घटक असला तरी काँग्रेसचेच नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसकडून चंद्रहार पाटलांना कितपत रसद मिळणार याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे चंद्रहार पाटलांनाही प्रचाराची गती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.सांगली मतदारसंघात सुमारे सहाशे गावे, महापालिका आणि चार नगरपालिका यांचा समावेश आहे. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत प्रचाराचा चेंडू पोहचवण्यासाठी तीनही उमेदवारांना ताकद लावावी लागेल हे निश्चित.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com