Amravati Loksabha Election 2024 : अमरावतीत हुकूमशाहीचा 'उदय'; लोकशाहीची 'हार'?

Bachchu Kadu Attack On Government : अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पोलिस, जिल्हा प्रशासन हे समानता, निःपक्ष भूमिका अधोरेखित करण्यात अपयशी ठरले आहेत.
Bachchu Kadu News
Bachchu Kadu News Sarkarnama

Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती येथे प्रहार जनशक्ती पक्षाला सायन्स कोअर मैदान सभेसाठी देत ते नंतर रद्द करणे, हे कुठले शहाणपण ? असा प्रश्न जनमानसात विचारला जात आहे. अमरावतीच्या घटनेबद्दल केवळ अमरावती येथे पडसाद उमटले नाही तर, बच्चू कडू यांना त्यामुळे संपूर्ण राज्यात या विषयावरुन सहानुभूती मिळाली. इतकेच नाही तर भाजपच्या दडपशाहीचा परिचय पुन्हा एकदा महाराष्ट्राला झाल्याचं बोललं जात आहे. (Bachchu Kadu Vs Ravi Rana)

अमरावतीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आधी प्रहारला परवानगी दिली त्यांनी भाजपला परवानगी नाकारली होती. अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पोलिस, जिल्हा प्रशासन हे समानता, निःपक्ष भूमिका अधोरेखित करण्यात अपयशी ठरले आहेत.

Bachchu Kadu News
Vinay Kore : 'जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला...' ; विनय कोरेंचं जाहीर विधान!

अमरावती येथील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने भाजप आयोजक विनोद गुहे यांना (23 व 24 एप्रिल रोजी) मैदान देता येणार नाही, असे लिहून दिले होते. मंगळवारी अचानक गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यासाठी प्रहारची परवानगी रद्द करणे हे हुकूमशाहीचे लक्षण असून याचा फटका संपूर्ण राज्यात भाजपला बसण्याची चिन्हे आहेत. मुळात प्रहार जनशक्ती पक्षाने उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी 23 व 24 एप्रिलसाठी अमरावती येथील सायन्स स्कोअर मैदान आरक्षित केले होते. त्याची रीतसर परवानगी काढली होती. त्यासाठीचे पैसे भरले होते. पावती, परवानगी पत्रही प्रहारला देण्यात आले होते.

लोकशाहीत सर्वांना समान अधिकार आहे. पहिले जो येणार त्याला पहिले परवानगी या तत्वावर ही परवानगी देण्यात आली होती. 22 एप्रिल रोजी अमित शाह यांची अमरावतीच्या सायन्स स्कोअर मैदानात सभा होणार होती. ती रद्द झाली आणि ती 24 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली. इतक्यावरच हा विषय थांबला नाही. 22 एप्रिल रोजी अमित शाहांच्या सभेसाठी भाजपने मंडप टाकला होता. तो कायम ठेवला गेला. असे असताना तत्पूर्वी 23 व 24 एप्रिल रोजी सायन्स स्कोअर मैदान हे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रहार जनशक्ती पक्षाला दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मैदानावरील सभेच्या तयारीसाठी बच्चू कडू Bachchu Kadu यांनी आज सायन्स स्कोअर मैदान गाठले तर तिथे त्यांना पोलिसांनी अडविले. रागारागात बच्चू कडू यांनी स्वतःच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या ठिकाणी उपस्थित पोलिसांचे थेट पाय बच्चू कडू यांनी धरले. अधिकारी देखील तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून आम्ही तुमचा आदर करत आहोत असे सांगत होते.

पण, पोलिस अधिकाऱ्यांच्या या वाक्यातील आदर कुठेही दिसून आला नाही. बच्चू कडू यांनी थेट तिथे ठिय्या आंदोलन आता सुरु केले आहे. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली त्यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला दिलेली परवानगी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रद्द केली.

Bachchu Kadu News
Solapur Lok Sabha : चमकोगिरी व्यंकटेश्वरा महास्वामींच्या अंगलट येणार; चार ठिकाणी अर्ज भरल्याने गुन्हा दाखल होणार

भाजपसमोर नतमस्तक झालेले हे अधिकारी निःपक्ष, निर्भिडपणे मतदान करण्याचा सल्ला सामान्य जनतेला कुठल्या तोंडाने देतील असा प्रश्न आहे. अमरावती येथे प्रशासनाचे हे अपयश नसुन केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग व संपूर्ण यंत्रणेचे अपयश आहे. केवळ एकाच मैदानावर सभा घेण्याचा आग्रह हा लोकशाही नाही तर भाजपची हुकूमशाही दाखवत आहे. अमित शाह यांच्या सुरक्षेच्या कारणावरुन दुसरे मैदान व इतर ठिकाणी सभा घेता येणार नाही, हे पोलिसांनी दिलेले उत्तर त्यांची अकार्यक्षमता अधोरेखित करत आहे.

भाजप BJP लोकसभा प्रतिनिधी विनोद घुगे यांना यापूर्वीच 23 व 24 रोजी सायन्स स्कोअर मैदान देता येणार नाही याचे पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पाठविले असताना पोलिसांनी सायन्स स्कोअर येथेच अमित शाह यांची सभा व्हावी, असा आग्रह सुरक्षेचे कारण पुढे करत का धरला. त्यासाठी प्रहारची परवानगी का रद्द केली असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सभेचे आयोजक भाजप होते की, पोलिस असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Bachchu Kadu News
Sangli Congress News : प्रदेश काँग्रेसची टीम गुरुवारी सांगलीत, पण विशाल म्हणतात; कारवाईचा प्रश्नच नाही

अमित शाह यांची सभा 22 एप्रिल रोजी होती. ती झाली नाही यात प्रहारची चूक नाही. त्यांची सभा 24 एप्रिल रोजी होत असताना त्यासाठी सभा स्थळ निश्चित करणे, सुरक्षित ते ठिकाण आहे की नाही, हे पाहणे ही सर्वस्वी जबाबदारी भाजप व प्रशासनाची आहे. त्यासाठी प्रहार जनशक्तीला दिलेली परवानगी रद्द करणे, हे लोकशाही व्यवस्थेला पोषक नाही. अमरावती येथील अधिकाऱ्यांची भूमिका निःपक्ष ठरली नाही हे मोठे अपयश आज प्रशासनाचे नाही तर देशातील लोकशाहीचे आहे. या अपयशात भाजप तितकीच वाटेकरी आहे.

Bachchu Kadu News
Palghar Lok Sabha News : पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला, पण कोणत्या चिन्हावर लढणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com