Ramdas Kadam News : निवडणुकीपूर्वी रामदास कदमांचं मोठं भाकीत; म्हणाले,'ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही पराभव...'

Political News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी उध्दव ठाकरेंसहीत शरद पवार आणि काँग्रेसचा पराभव होईल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केले.
Ramdas Kadam
Ramdas Kadam sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वानी जोरात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी विरोधकावर सडकून टीका केली.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही सगळे रात्रंदिवस मिळून काम करत आहोत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी उध्दव ठाकरेंसहीत शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचा पराभव होईल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केले.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात सुरु असलेल्या चर्चेवर बोलताना रामदास कदम म्हणाले, महायुतीच्या सर्व नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. जागा वाटपाचा जो निर्णय होईल तो निर्णय माझ्यासहीत सर्वांना मान्य असेल. कोणाचीही नाराजी राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

दापोलीमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांनी बोलावून समज द्यावी, असे दापोलीमधील भाजप-शिवसेना (Shivsena) वादावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटप जाहीर करायला उशीर झालेला नाही. निकाल लागेल तेव्हा उध्दव ठाकरेंसहित शरद पवार आणि काँग्रेस नेस्तनाबुत होईल असेही रामदास कदम म्हणाले.

Ramdas Kadam
MVA News : 'मविआ'च्या जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी चेन्निथला, पवारांची मध्यस्थी

दापोलीमधील मुस्लिम समाज माझ्यासोबत असल्याने समोरच्या उमेदवाराचे डीपॉजीट येत्या निवडणुकीत जप्त होणार आहे. दापोलीमधील मुस्लिम समाज माझ्यासोबत असल्याने विरोधकांची मोठी निराशा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ramdas Kadam
Mahayuti News : कोण घेणार माघार, अजितदादा की फडणवीस ? खडकवासला, वडगाव शेरी कोणाकडे जाणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com