Ajit Pawar : वाह क्या बात है...! दिल्लीत अजितदादांना मानच मान!

Ajit Pawar From NDA Alliance Meeting : अजित पवार यांना दिलेल्या चारपैकी एकाच जागेवर उमेदवार जिंकून आला, तरीही मोदी-शाह यांच्या दिल्ली दरबारात अजितदादांचा मान कायम राहिला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

New Delhi, 07 June : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पडझड होईल, याचा अंदाज असलेल्या भाजप नेतृत्वाने शिंदेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सत्तेत घेतले आणि उपमुख्यमंत्रिपद बहाल केले. त्याचवेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनाही भाजपने गळाला लावले.

हे कमी काय म्हणून राज ठाकरेंना आपल्याकडे ओढून घेतले. परिणामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्ष बलाढ्य होतील, अशी आशा भाजप नेतृत्वाला असावी. मात्र, नेमके उलट झाले.

भरवशाच्या अजित पवारांचा फारसा फायदा झाला नाही. अजित पवार यांना दिलेल्या चारपैकी एकाच जागेवर उमेदवार जिंकून आला, तरीही मोदी-शाह यांच्या दिल्ली दरबारात अजितदादांचा मान कायम राहिला आहे.

केंद्रात सरकार स्थापन करण्यापूर्वी भाजपने बोलावलेल्या ‘एनडीए’च्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रात अजित पवार यांच्या किती आणि काय जागा निवडून आल्या.

यापेक्षा दिल्लीत मोदी-शाह (Modi-Shah) यांच्या डोळ्यादेखत झालेला सन्मान विशेष बाब ठरली, त्यामुळे दिल्लीत अजित पवारांचे वजन कायम असल्याचे स्पष्ट दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज नेता निवडीची बैठक झाली. त्या बैठकीला घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना व्यासपीठावर विशेष स्थान देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांच्या पंक्तीत अजितदादांना व्यासपीठावर मान देण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या शेजारी अजितदादांची बसण्याची व्यवस्था केली होती, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भलेही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले नसले तरी एनडीएच्या बैठकीत दादांना सन्मानाची वागणूक देण्यात आली.

Ajit Pawar
Ramtek's Defeat Effect : रामटेकचा पराभव भाजपच्या जिव्हारी; एका आमदाराचे तिकिट कापणार, दुसऱ्याची मंत्रिपदाची संधी हुकणार!

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा लढवल्या होत्या. त्यातील रायगड या एकाच जागेवर सुनील तटकरे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले आहेत, त्यामुळे अजितदादांच्या राजकीय सामर्थ्याबद्दल महाराष्ट्रात चर्चा हेात असताना दिल्लीत मात्र एनडीएच्या बैठकीत अजित पवारांना मानाचे स्थान मिळाले आहे.

या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांची एनडीए आघाडी आणि लोकसभा सभागृहाच्या नेतेपदी नियुक्तीचा प्रस्ताव मांडला. त्याला अमित शाह, नितीन गडकरी, कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, एकनाथ शिंदे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देणारे भाषणही केले.

Edited By : Vijay Dudhale

Ajit Pawar
NDA Meeting Modi 3.0 : एकनाथ शिंदे अन् अजितदादांनी संसद भवनात पहिल्यांदाच ठोकलं भाषण; नेमकं काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com