Tej Pratap Yadav : तेजप्रताप यादव तुरुंगात जाणार? ; घटस्फोट झालेला नसताना, दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवणे महागात पडणार?

Tej Pratap Yadav relationship News : जाणून घ्या, काय आहे कायद्यात तरतूद? ; तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्यातील घटस्फोटाबाबत खटला अद्याप प्रलंबित आहे.
Tej Pratap Yadav facing legal scrutiny for allegedly staying in a relationship with Anushka Yadav without divorcing his wife Aishwarya Rai.
Tej Pratap Yadav facing legal scrutiny for allegedly staying in a relationship with Anushka Yadav without divorcing his wife Aishwarya Rai. sarkarnama
Published on
Updated on

Tej Pratap Yadav Relationship Controversy Explained : आपल्या अजब-गजब कारनाम्यांनी आणि विधानांनी कायम चर्चेत राहणारे तेजप्रताप यादव पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र असलेल्या तेजप्रताप यादव यांनी सोशल मीडियावर अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबत ते बारा वर्षांपासून संबंधात असल्याचं सांगितलं होतं.

मात्र नंतर त्यांनी माझे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहे, असं सांगत त्या पोस्टबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र या प्रकरणावरून प्रचंड भडकलेले त्यांचे वडील आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी कडक भूमिका घेत त्यांना थेट पक्षातूनच निलंबित केले, त्यामुळे त्यांच्या पोस्टमध्ये कुठंतरी सत्य होतं असंही मानलं जात आहे.

तेजप्रताप यादव यांच्या दाव्याने अनेकप्रकारचे प्रश्न उपस्थित केले. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की, आता सध्या त्यांचा पत्नी ऐश्वर्यासोबत घटस्फोट झालेला नाही. दोघांमध्ये अद्याप घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतोय की घटस्फोट न होता तेजप्रताप यादव दुसऱ्या महिलेशी विवाह करू शकतात का? जर विवाह केला नाही तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याबद्दल कोणती शिक्षा होवू शकते का? सोबत जरी नाही राहिले तरी उघडपणे दुसऱ्या महिलेशी प्रेमाची कबुली दिल्यावरही, कोणताही कायदेशीर नियम तेजप्रताप यांना अडचणीत आणू शकतो? भारतीय कायदा या सर्व प्रश्नांबाबत काय सांगतो, ते जाणू घेण्याचा प्रयत्न करूयात.

Tej Pratap Yadav facing legal scrutiny for allegedly staying in a relationship with Anushka Yadav without divorcing his wife Aishwarya Rai.
Donald Trump and Elon Musk clash : मस्क अन् ट्रम्प यांच्या मैत्रीत दुरावा! ; जाणून घ्या, नेमकी कोणती गोष्ट ठरली कारणीभूत?

बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचा विवाह २०१८मध्ये ऐश्वर्या यांच्याशी झाला होता, ज्या बिहारचे माजी मुख्यमंत्री दारोगा प्रसाद राय यांची नात आणि बिहारच्या माजी मंत्री चंद्रिका प्रसाद राय यांची मुलगी आहे. तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यात विवाहानंतर तणाव निर्माण झाला होता आण काही कालावधीनंतर दोघांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, म्हणजे कायदेशीरदृष्ट्या तेजप्रताप आणि ऐश्वर्या हे पती-पत्नी आहेत.

भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत विवाहबाह्य संबंध किंवा व्यभिचार हा अवैध संबंधांच्या श्रेणीत ठेवून गुन्हा मानला जात होता, परंतु आता IPC ऐवजी भारतीय न्याय संहिता (BNS) लागू करण्यात आली आहे. BNS मध्ये, घटस्फोटाशिवाय शारीरिक संबंध ठेवणे किंवा दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवणे हे गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, घटस्फोटाशिवाय अनुष्का यादवसोबत संबंध ठेवल्याबद्दल तेजप्रताप यादववर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही.

Tej Pratap Yadav facing legal scrutiny for allegedly staying in a relationship with Anushka Yadav without divorcing his wife Aishwarya Rai.
Kanchan Gadkari Giant onion farming : अबब! एक कांदा चक्क एक किलोचा अन् एकारात १३ टण उत्पादन; कांचन गडकरींचा अनोखा प्रयोग

तेजप्रताप यादव यांचा पत्नी ऐश्वर्या सोबत घटस्फोटाचा खटला सुरू आहे. त्याआधीच त्यांनी अनुष्का यादवसोबत आपले रिलेशनशीप जाहीर केले आहे. अशावेळी त्यांना अनुष्कासोबतही लग्न करावं लागू शकतं. जर ते घटस्फोट न घेता विवाह करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल का?

Tej Pratap Yadav facing legal scrutiny for allegedly staying in a relationship with Anushka Yadav without divorcing his wife Aishwarya Rai.
Fauzia Tarannum : कोण आहेत फौजिया तरन्नुम? ज्यांच्यावरील टिप्पणीने भाजप आमदार आला अडचणीत!

बीएनएसमध्ये याबद्दलही स्पष्ट तरतूद आहे. जर कोणताही पुरुष किंवा महिला घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरा विवाह करत असेल, तर तो विवाह शून्य मानला जातो, म्हणजे त्यास कायदेशीर मान्यता मिळत नाही. पहिली पत्नी या प्रकरणात आपल्या पतीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ८२(१) अंतर्गत खटला दाखल करू शकते. जरी हा जामिनपात्र गुन्हा असेल तरी न्यायालय आरोपीला सात वर्षांची शिक्षा आणि दंडाची शिक्षा देऊ शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com