Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा मतदारसंघात आमदारांची कसोटी, इच्छुकही गॅसवर; नेमकं गणित काय?

Loksabha Election 2024 : शिरुर लोकसभा मतदार संघात तब्बल 25 लाख 27 हजार 241 एवढ्या मतदारांची नोंद आहे. बूथ निहाय आमदार, विधानसभेला इच्छुक किती मतदान करवून घेतोय याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol KolheSarkarnama

भारत पाचंगे

Loksabha Election News : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. शिरुर मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांच्या कामगिरीकडे वरिष्ठ नेत्यांचे लक्ष असणार आहे.

बूथनिहाय मतदानाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या मतदानामुळे इच्छुकांसह विद्यमान आमदारांची देखील कसोटी लागणार आहे. उद्याचे मतदान उमेदवारांसह शिरुरमधील तब्बल दीड डझन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसाठी राजकीय भविष्य ठरविणारी ही निवडणूक असणार आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात Shirur LokSabha तब्बल 25 लाख 27 हजार 241 एवढ्या मतदारांची नोंद आहे. बूथ निहाय आमदार, विधानसभेला इच्छुक किती मतदान करवून घेतोय याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक गॅसवर असल्याची कबूली देत आहेत. यावेळी मतदारसंघातील 2501 बूथ शिरुर लोकसभा मतदार संघातील सहा आमदार MLA आणि सुमारे डझनभर विधानसभेच्या इच्छुकांसाठी धडकी भरविणारे ठरणार आहेत.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
Ravindra Dhangekar News : आमदार धंगेकरांचा चौकीत ठिय्या; घराघरात पैसे वाटतं असल्याचा आरोप...

पवार-कंद-फराटे-कटकेंची कसोटी

शिरुर हवेली हा एकमेव मतदारसंघ असा आहे की, येथील विद्यमान आमदार अशोक पवार हेपुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहिले आहेत. त्यांना पक्षांतर्गत एकही प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांना फक्त आता मताधिक्य टिकवायचे हेचआव्हान आहे.

दूसरीकडे राष्ट्रवादीकडून भाजपामध्ये जावून विधानसभा डोळ्यापुढे ठेवलेले जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांची कसोटी लागणार आहे. ही उमेदवारी अजित पवारच ठरविणार असल्याने कंदांसह नुकतेच भाजपामधून राष्ट्रवादीत गेलेले घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके या सर्वांना आता बूथ निहाय मताधिक्य आपापल्या पक्षश्रेष्ठींना दाखवून देण्याचे मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खेडकडे लक्ष

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील अजित पवारांसोबत आहेत.भाजपाचे मतदारसंघ प्रमुख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी भाजपाला रामराम करीत थेट शरद पवार गटात प्रवेश केल्याने या गटाकडून त्यांना विधानसभेसाठीची उमेदवारी प्राप्त करण्यासाठी लोकसभा निवडणूकीतील मतपेटीची किमया दाखवून द्यावी लागणार आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील तसेच ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांचे लक्षही विधानसभा-२०२४ असल्याचे बोलले जात असल्याने या दोघांचीही कसोटी मतदानासाठी लागणार आहे.

आंबेगावात काय?

राज्यातील राजकीय उलथापालथीने आंबेगावातील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकत्र येणे भाग पाडले. दोन्ही पाटील एकत्र येवून दोघांना सेफ करण्याचे राजकारण आंबेगावात यावेळी तब्बल २० वर्षांनी झाले. अर्थात या दोघांच्या युतीमध्येही आपण तग धरु शकतो आणि मताधिक्य मिळवू शकतो हे देवदत्त निकम यांना सिद्ध करावे लागणार आहे.

चार सेनापतींची कसोटी

आमदार अतुल बेणके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आणि जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे या तिघांनाही विधानसभा-२०२४ खुणावतेय. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला आपल्या भागातून किती लीड देणार याची उत्सुकता असणार आहे.

हडपसर-भोसरीमध्येही सुप्त स्पर्धा

चेतन तुपे आणि योगेश टिळेकर या आजी माजी आमदारांमधील सत्ता स्पर्धेसारखीच परिस्थिती भोसरीमध्ये महेश लांडगे व विलास लांडे या दोघांमध्ये आहे. विशेष म्हणजे हे चौघेही महायुतीचे भाग असल्याने या चौघांनाही आपली ताकद मतपेट्यांद्वारे सिध्द करावी लागणार आहे. कारण या मतदानावरच विधानसभा-२०२४ मध्ये उमेदवारीचा दावा महायुतीकडून करावा लागणार आहे.

(Edited By Roshan More)

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
Raj Thackeray Sabha : शरद पवारांनी राज्यात पहिल्यांदा फोडाफोडीचे राजकारण केलं; राज ठाकरेंनी सगळंच काढलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com