Assembly Election News : युती-आघाडीने इच्छुकांची गोची, विधानसभेला बंडाचे झेंडे फडकणार?

Mahayuti vs Mahavikas Aghadi : कागल, चंदगड, इचलकरंजी आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांमध्ये बिग फाईट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Assembly Election News
Assembly Election Newssarkarnama

Assembly Election News : काँग्रेस शिवसेना हे परंपरागत विरोधक तर राष्ट्रवादी भाजप हे एकमेकांचे शत्रू, हे महाराष्ट्राच्या राजकाराण सूत्र राहिले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रयोगाने हे सगळे सूत्र विस्कटले आणि नवे सूत्र उदयाला आले. काँग्रेस-शिवसेना एकत्र आली. पण भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडून राज्यातील राजकारण आणखी बदलले अजित पवार भाजपसोबत गेले. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात कट्टर शत्रू मित्र झाले. तर मित्र असणारे शत्रू झाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नेत्यांचे मनोमिलन करत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मात्र, लोकसभेला जे सहज शक्य झाले ते विधानसभेला करताना मोठे आव्हान महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे.

Assembly Election News
Ajit Pawar News: नितीन पाटलांना दिलेला शब्द अजितदादा पूर्ण करणार; राज्यसभेची जागा साताऱ्यालाच...

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात Aassembly constituency महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघात महत्त्वपूर्ण लढतीचे संकेत आहेत. कागल, चंदगड, इचलकरंजी आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांमध्ये बिग फाईट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसंगी काहींनी स्वतंत्र किंवा अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी बंड करण्याची योजना ही आखून ठेवली आहे. कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाडगे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.

तर, चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी NCP अजितदादा पवार गटाचे राजेश पाटील आणि भाजपचे शिवाजी पाटील यांच्यातच लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार के पी पाटील यांच्यातच फाईट होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अपक्ष सहयोगी आमदार प्रकाश आवाडे आणि सुजित हळवणकर यांच्यातच लढत निश्चित मानली जाते. शिवाय कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्हीकडे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि भाजपचे सत्यजित कदम उमेदवारीवरून रस्सीखेच असेल असा अंदाज आहे.

महाविकास आघाडीमध्ये माजी आमदार मालोजीराजे, शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार आणि आमदार जयश्री जाधव यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि घटक पक्ष असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे संताजी घोरपडे यांच्यात उमेदवारीवरून सुरस निर्माण होईल.

प्रबळ दावेदार कोण?

महायुतीचे सर्व घटक पक्ष स्वतंत्र लढण्याचा निर्णय झालास प्रबळ आणि दावेदार उमेदवारांची कमतरता महायुतीमध्ये आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती पेक्षा महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. विद्यमान आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार सुजित मिनचेकर यांच्यात उमेदवारीवरून चढाओढ निर्माण होईल.

'या' मतदारसंघात डोकेदुखी वाढणार

महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास कागल, चंदगड आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. तर कोल्हापूर उत्तर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डोकेदुखी वाढणार आहे. स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास महाविकास आघाडीत कोल्हापूर दक्षिण, आणि करवीर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडे पुरेसे पाठबळ असणारा उमेदवार नाही.

(Edited By Roshan More)

Assembly Election News
Congress News : पंतप्रधान मोदींच्या 'या' बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार जोरदार शक्तिप्रदर्शन!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com