Narendra Modi Government: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुका पुढच्या वर्षी आहेत. त्या पार्श्वभूमीवर नऊ वर्षातील आपल्या कामाचा लेखाजोखा मोदी सरकार जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचं योगदान कोणतं? याबाबत जनतेला काय वाटतं? हे जाणून घेण्यासाठी 'सकाळ-साम'च्यावतीने मतदारांचा सर्वे करण्यात आला आहे.
या सर्वेच्या माध्यमातून लोकभावनेचा अंदाज समोर आला आहे. राज्यभरातील सर्व स्तरातील तब्बल 49 हजार लोकांशी बोलून हा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचे योगदान कोणते आहे, असं आपल्याला वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाच्या खाली वेगवेगळे पर्यात देण्यात आले होते. यामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली, सरकारच्या योजना, राम मंदिर, नोटबंदी, कलम 370 रद्द करणं, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, वरीलपैकी सर्व, यापैकी कोणतेही नाही, सांगता येणार नाही, अशा प्रकारचे पर्याय देण्यात आले होते.
या पर्यायांपैकी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली हा पर्याय तब्बल 20.6 टक्के लोकांनी निवडला. यावरून 20.6 टक्के लोकांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली, असं वाटतं.
याबरोबरच राम मंदिर हा पर्याय 12.9 टक्के तर कलम 370 रद्द करणं हा पर्याय 11 टक्के लोकांनी निवडला. यावरून राम मंदिर हे 12.9 टक्के तर 370 रद्द करणं हे 11 टक्के लोकांना मोदी सरकारच्या कारकीर्दीतील महत्वाचं योगदान आहे, असं वाटतं. याबरोबरच यापैकी कोणतेही नाही हा पर्याय 16.1 टक्के आणि सांगता येणार नाही हा पर्याय 9.7 टक्के लोकांनी निवडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचं योगदान कोणतं, असं आपल्याला वाटतं?
• भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली : 20.6 टक्के
• सरकारच्या योजना : 4.9 टक्के
• राम मंदिर : 12.9 टक्के
• नोटबंदी : 4.6 टक्के
• कलम 370 रद्द करणं : 11 टक्के
• संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता : 3.5 टक्के
• वरीलपैकी सर्व : 12.2 टक्के
• यापैकी कोणतेही नाही : 16.1 टक्के
• सांगता येणार नाही : 9.7 टक्के
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.