NCP Hearing : राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या; निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार

Sharad Pawar Vs Ajit Pawar : या सुनावणीपूर्वी शरद पवार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजुर्न खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांना भेटणार आहेत.
Sharad Pawar -Ajit Pawar
Sharad Pawar -Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP Hearing : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच पवार यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू संघवी युक्तिवाद करणार आहेत. (Whose NCP: Sharad Pawar will attend the Election Commission hearing)

दरम्यान, या सुनावणीपूर्वी शरद पवार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजुर्न खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांना भेटणार आहेत. या भेटीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून महेश जेठमलानी, नीरज किशन कौल, मनिंदरसिंह हे बाजू लढवणार आहेत

Sharad Pawar -Ajit Pawar
Rashmi Shukla New DGP? : रश्मी शुक्लांविरोधात शिवसेना आक्रमक; पोलिस महासंचालक झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून कागदपत्रे, पुरावे आयोगाकडे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचा याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीत पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निर्णय होणार आहे. सुनावणीवेळी शरद पवार बोलणार का, आपली बाजू मांडणार का, याचीही उत्सुकता असणार आहे.

Sharad Pawar -Ajit Pawar
Manoj Jarange News : मी राजकारणात जाणार नाही, ती आपली वाट नाही; मनोज जरांगे पाटलांची भूमिका

राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या लढाईत शरद पवार यांच्या बाजूने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. ही सुनावणी आज दुपारी चार वाजता दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात होणार आहे. त्या सुनावणीकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

Sharad Pawar -Ajit Pawar
Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे 'मिशन सोलापूर' ; पंधरा दिवसांत पवारांसह जयंत पाटील, सुळेंचा जिल्ह्यात दौरा

शरद पवार खर्गे-राहुल गांधींना भेटणार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत दुपारी चार वाजता सुनावणी होण्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार हे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची दुपारी दोन वाजता भेट घेणार आहेत. खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीत काय चर्चा होणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष असणार आहे.

Sharad Pawar -Ajit Pawar
Solapur Sabha : भुजबळसाहेब, सत्तेचा अन्‌ खुर्चीचा गैरवापर करू नका; जरांगे पाटलांनी पुन्हा केले लक्ष्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com