Aaditya Thackeray: एकटे आदित्य ठाकरे फडणवीस-शिंदेंना जातायत जड! सत्ताधारी आमदार अन् मंत्र्यांना बदलावाच लागणार 'प्लॅन'

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचा यंदाच्या पावसाळी अधिवेशनातील आवेश आणि एकूण परफॉर्मन्स वाखाणण्यासारखाच राहिला आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

-- पांडुरंग म्हस्के 

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा यंदाच्या पावसाळी अधिवेशनातील आवेश आणि एकूण परफॉर्मन्स वाखाणण्यासारखाच राहिला आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे सभागृहात सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी मिळणारा प्रोटोकॉल विरोधी पक्षांना मिळेलच याची खात्री नाही. वास्तविक सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात विधिमंडळात बोलण्याचा मूलभूत अधिकार विरोधी पक्षांचा असतो. परंतु विरोधी पक्षाच्या क्षीण असलेल्या सदस्य संख्येमुळे अधिकारांचा साक्षेप होतो की काय अशी परिस्थिती असताना, विधिमंडळात आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षांचा आवाज बनून राहिल्यासारखी परिस्थिती आहे. अधिवेशनात सभागृह सुरु होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर होणारे आंदोलन असो किंवा सभागृहात सरकारच्या धोरणांवर टीका करणे असो, आदित्य ठाकरे यांचा आवाज चांगलाच वाढलेला दिसत आहे. 

Aaditya Thackeray
Pune Crime : सेक्स वर्करकडं गेला तर घरापर्यंत पाठलाग! पुण्यात ब्लॅकमेलिंगच्या 'बुधवार पेठ पॅटर्न' मुळं खळबळ

विशेष म्हणजे भाषणात कोणताही आक्रस्ताळेपणा नाही. एकदम मुद्द्यावर बोट ठेवून विरोधकांना विशेषतः शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सदस्यांना व्यक्त होण्यास भाग पडणारे त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण या अधिवेशनात विशेष चर्चेचा विषय राहिले. विरोधकांच्या २९३च्या चर्चेत सहभागी होताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विशेषतः नागरी भागातील सर्वसामावेशक मुद्द्यांचा आढावा घेऊन सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राज्यातील महत्वाच्या शहरांच्या ढासळत्या सेवांवर भाष्य करताना विद्यमान सरकारवर नेमके शरसंधान साधले. मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या महत्वाच्या महापालिकांवर लोकनियुक्त प्रतिनिधी असणे गरजेचे असल्याचे सांगताना सरकारने गेल्या काही वर्षाच्या काळात महापालिकांवर नेमलेल्या प्रशासकाच्या माध्यमातून शहरांची लूट चालवल्याचा थेट आरोपच केला.   

Aaditya Thackeray
Devendra Fadnavis: फडणवीसांनी सभागृहातच उद्धव ठाकरेंना दिली थेट ऑफर! म्हणाले, इकडे यायचं...

Summary:

  1. अदिती ठाकरे यांचा प्रभाव: पावसाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षाचा प्रभावी आवाज बनून सरकारला जोरदार टक्कर दिली.

  2. विरोधी पक्षाची कमकुवत स्थिती: विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने सभागृहात सरकारविरोधी भूमिका प्रभावीपणे मांडणे कठीण झाले आहे. तरी, आदित्य ठाकरे यांनी ती जबाबदारी उचलल्याचं चित्र आहे.

  3. सभागृहाबाहेरही सक्रीय सहभाग: सभागृह सुरू होण्यापूर्वी आंदोलन आणि सभागृहात सरकारवर टीका करून ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले.

Aaditya Thackeray
Shivshakti-Bhimshakti : युतीची घोषणा! "रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाट्याची हमी"; आनंदराज आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक

मुंबई महापालिकेतील परिवहन-बेस्ट सेवा कशा पद्धतीने रसातळाला चालली आहे आणि त्यातून नागरिकांना कसा त्रास होत आहे? याबद्दलचे भाष्य अंजन घालणारे होते. त्याचबरोबर महापालिकेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरु केलेल्या मुंबई पब्लिक स्कूलची झालेली वाईट अवस्था, शाळांच्या सुरक्षितेबाबत बोलतानाच 'राईट टू एजुकेशन' बरोबरच 'राईट टू क्वालिटी' आणि 'राईट टू इक्वालिटी' सुद्धा शिक्षणात असणे गरजेचे असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी नमूद केला. विकासाच्या नावाखाली मुंबईतील खंडोबाची टेकडी, पुण्यातील वेताळ टेकडी आणि नागपूरमधील अजनी वन यांचा कसा ऱ्हास सुरु आहे हे सांगतानाच सरकारचा विकास कसा तकलादू आहे, हेही त्यांनी यावेळी मांडले.     

Aaditya Thackeray
Pune Crime : सेक्स वर्करकडं गेला तर घरापर्यंत पाठलाग! पुण्यात ब्लॅकमेलिंगच्या 'बुधवार पेठ पॅटर्न' मुळं खळबळ

पायऱ्यांवर केल्या जाणाऱ्या विरोधकांच्या आंदोलनाबाबतसुद्धा अशीच परिस्थिती. महाविकास विकास आघाडीतील सर्वच पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी होत असले, तरी विशेष प्रभाव जाणवला आदित्य ठाकरे यांचाच. याचे महत्वाचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचे मुख्य लक्ष्य हे आदित्य ठाकरे हेच असतात. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांना तेवढ्याच लढाऊ पद्धतीने उत्तर देणे आवश्यक होते. ते त्यांनी चोख केले. पायऱ्यांवर आंदोलन करताना शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भारत गोगावले, संतोष बांगर यांना प्रत्युत्तर देताना. त्यांची सातत्याने खिल्ली उडविणाऱ्या नितेश राणे यांनाही त्यांनी सोडले नाही. 

Aaditya Thackeray
Devendra Fadnavis: फडणवीसांनी सभागृहातच उद्धव ठाकरेंना दिली थेट ऑफर! म्हणाले, इकडे यायचं...

FAQs :

  1. प्रश्न: पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाचा प्रमुख आवाज कोण ठरला?
    उत्तर: आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षाचा प्रमुख आवाज ठरले.

  2. प्रश्न: महाराष्ट्र विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेता का नाही?
    उत्तर: विरोधी पक्षातील संख्याबळ कमी असल्याने नेतेपद मिळालेलं नाही.

  3. प्रश्न: आदित्य ठाकरे सभागृहात काय भूमिका बजावत आहेत?
    उत्तर: सरकारच्या धोरणांवर टीका करत विरोधकांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

  4. प्रश्न: आंदोलनात ठाकरे यांची भूमिका काय आहे?
    उत्तर: ते सभागृहाच्या बाहेरही आंदोलनात सक्रीय सहभाग घेत आहेत.

विधानसभेत २०३ च्या प्रस्तावर बोलताना त्यांनी सरकारची पिसे काढलीच, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांची 'चड्डी बनियान गॅंग' अशी संभावना केली. या त्यांच्या सगळ्या आक्रमक भूमिकेचा त्यांना सभागृहात चांगलाच फटका बसतो. २९३च्या चर्चेत आदित्य ठाकरे यांनी बोलण्यास सुरुवात करताच मंत्री शंभूराज देसाई यांनी तांत्रिक मुद्दा काढत त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर चड्डी बनियान गॅंग असा शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांचा उल्लेख केल्याने आमदार निलेश राणे आदित्य ठाकरे यांचे भाषण संपताच चड्डी बनियान गँग कोणाला म्हणालात याचे उत्तर द्या, असा नळावरील भांडणाच्या आवेशात विचारणा केली. 

Aaditya Thackeray
Prakash Mahajan: अमित ठाकरे घेणार प्रकाश महाजनांची भेट! मनसेत राहणार की जाणार? महाजनांच्या मनात नेमकं काय सुरुए?

लक्षवेधी सूचनेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारताच सत्ताधारी मंत्री विशेषतः शिवसेनेचे मंत्री आणि सदस्य जास्तच डिस्टर्ब होतात. याचा प्रत्यय मंगळवारी वरून देसाई यांच्या वांद्रे येथील संरक्षण खात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या प्रश्नावरील चर्चेत आला. आदित्य ठाकरे यांनी चर्चेत भाग घेताच मंत्री शंभूराज देसाई अनावश्यकरीत्या आक्रमक झाले, त्याला आदित्य ठाकरे यांनीही तसेच उत्तर दिले. गेल्या काही दिवसांतील आदित्य ठाकरे यांचा आक्रमकपणा सत्ताधारी पक्षाला चांगलाच जड जाणार आहे, त्यामुळे केवळ त्यांना टार्गेट करून शाळा किंवा कॉलेजमधील मुलांसारखी त्यांच्यावर टारगट टीका करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने परंतू विधायक अशी मुद्देसूद टीका करून आदित्य ठाकरे यांना प्रत्यत्तर देणे आवश्यक ठरणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com