Sharad Pawar Politic's : मोहिते पाटील, संजीवराजेंनंतर राष्ट्रवादी प्रवेशासाठी माढा मतदारसंघात कोणाचा नंबर?

Sanjivraje Naik Nimbalkar Join NCP : मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणून माढा लोकसभा मतदारसंघात सुरू केलेले ‘इनकमिंग’चे वारे फलटणच्या संजीवराजेंपर्यंत पोचले आहे.
Sharad Pawar-Sanjivraje Naik Nimbalkar-Vijayshinh Mohite Patil
Sharad Pawar-Sanjivraje Naik Nimbalkar-Vijayshinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur,12 October : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील मातब्बर राजकीय घराणे असलेल्या मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणून माढा लोकसभा मतदारसंघात सुरू केलेले ‘इनकमिंग’चे वारे फलटणच्या संजीवराजेंपर्यंत पोचले आहे. मोहिते पाटील यांच्यानंतर शेजारच्या इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी देण्यात शरद पवार यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील, फलटणच्या राजेंच्या प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील कोणत्या नेत्याचा राष्ट्रवादी प्रवेशासाठी पुढचा नंबर असणार, अशी चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केवळ 14 आमदार राहिले होते. मात्र केवळ 14 आमदारांच्या जोरावर शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ‘स्ट्राईक रेट’ने आठ खासदार निवडून आणले. शिवरत्न बंगल्यावरील बैठकीनंतर वारे फिरण्यात सुरुवात झाली होती.

लोकसभा निवडणुकीत भाजपने मोहिते पाटील (Mohite Patil) यांना माढ्यात उमेदवारी डावल्यानंतर त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पवारांनी फासे टाकण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काहींशी तटस्थ भूमिका घेत तुतारीला अनुकूल ठरणारा निर्णय घेतल्याची चर्चा होती.

Sharad Pawar-Sanjivraje Naik Nimbalkar-Vijayshinh Mohite Patil
Laxman Dhoble ; माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंवर भाजप सोडण्याचा समर्थकांचा दबाव; काय आहे कारण?

मोहिते पाटील यांनी तर तुतारीकडूनच निवडणूक लढवली होती, त्यामुळे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामराजे आणि मोहिते पाटील यांची शिवरत्नवर बैठक झाली होती.

लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहिलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी वेगळीच चाल खेळली असून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत राहत मुलगा, भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार आमदार दीपक चव्हाण यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पाठवले आहे, त्यामुळे अकलूजपासून सुरू झालेले इनकमिंगचे वारे फलटणपर्यंत पोचले आहे.

Sharad Pawar-Sanjivraje Naik Nimbalkar-Vijayshinh Mohite Patil
Booster dose : विधानसभेसाठी दत्तात्रेय भरणे, राजन पाटलांना 'ऊर्जा'

माढा लोकसभा मतदारसंघातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा दरवाजा ठोठावत आहेत. मात्र, ते शरद पवारांनी अजून त्यांना दाद लागू दिलेले नाही. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील कोणत्या नेत्याचा राष्ट्रवादी प्रवेशासाठी पुढचा नंबर असणार, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com