Ajit Pawar : अजितदादाही कच्या गुरुचे चेले नाहीत...

Modi Government 3.0 : भाजपकडून राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद देऊ करण्यात आले होते. त्याबाबत मनधरणीसाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आले होते.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

New Delhi, 09 June : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आज (ता. 09 जून) सायंकाळी सत्तेवर येत आहे. मंत्रिपदावरून शपथविधीपूर्वीच ‘एनडीए’च्या घटक पक्षांमध्ये रुसवे फुगवे पहायला मिळाले.

नेता निवडीच्या बैठकीत मानाचे स्थान मिळालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपदाची संधी नसल्याची चर्चा सुरू असताना पडद्यामागे जोरदार हालचाली घडत होत्या.

भाजपकडून राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद देऊ करण्यात आले होते. त्याबाबत मनधरणीसाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आले होते. मात्र, अजितदादांनी राज्यमंत्रिपदाची ऑफर धुडकावून लावत कॅबिनेट मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहत आपणही कच्या गुरुचे चेले नाही, असे दाखवून दिले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. मागील दोन सरकारपेक्षा हे वेगळे सरकार असणार, याची प्रचिती पहिल्याच दिवशी भाजपला (BJP) आली असावी. मंत्रिपदावरून ‘एनडीए’च्या घटक पक्षांमध्ये राजीखुशी दिसून आली.

महाराष्ट्रातून ‘एनडीए’चे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील दुसरा सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्रिपदाबाबत माध्यमांमधून वेगवेगळ्या चर्चा सुरू होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपदाची शपथ संधी नाही, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, त्याचवेळी पडद्याआड वेगवान राजकीय घडामोडी घडत होत्या. बाहेर राष्ट्रवादीला मंत्रिपद नाही, असे सांगितले जात असताना मात्र स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद पक्षाला देण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते राज्यमंत्रिपद स्वीकारायला तयार नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र कार्यभाराचे राज्यमंत्रिपद स्वीकारावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी या अगोदर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी कॅबिनेट मंत्रिपद देण्यात यावे, असा आग्रह पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यापासून सर्व वरिष्ठ नेत्यांनी धरला.

स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची ऑफर धुडकावून लावली. आगामी काळात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेला आहे.

Ajit Pawar
Punekar Union Minister : केंद्रीय मंत्रिमंडळातील पुणेकर....काकासाहेब गाडगीळ ते मुरलीधर मोहोळ!

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार निवडून आले आहेत, त्यामुळे अजित पवार दुय्यम भूमिका घेतील, अशी चर्चा सुरू होती. त्यादृष्टीने केंद्रात राष्ट्रवादीला संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, अजितदादांचा स्वभाव पाहता ते दुय्यम भूमिका घेतील, अशी सूतराम शक्यता नव्हती आणि झालेही तसेच.

भाजपकडून स्वतंत्र राज्यमंत्रिपदाची दिलेली ऑफर अजितदादांनी आपल्या स्वभावाप्रमाणे धुडकावून लावत आपणही कच्या गुरुचे चेले नाहीत, हे दाखवून दिले. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा आपला आग्रह कायम ठेवला आणि भाजपकडून पुढील मंत्रिमंडळ विस्तारात ते देण्याचे मान्य केले.

Ajit Pawar
Modi Government 3.0 : मुरलीधर मोहोळ पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गजांच्या लिस्टमध्ये!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com