Punekar Union Minister : केंद्रीय मंत्रिमंडळातील पुणेकर....काकासाहेब गाडगीळ ते मुरलीधर मोहोळ!

Modi Government 3.0 : भाजपकडून पहिल्यांदाच लोकसभेला निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
Punekar Union Minister
Punekar Union Minister Sarkarnama

Pune, 09 June : मोदी सरकार ३.० मध्ये पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची वर्णी निश्चित आहे. लोकमान्य टिळकांपासून पुण्याला नेतृत्वाची उज्ज्वल अशी परंपरा आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातही पुण्याला स्थान मिळाले होते. पुण्याचे खासदार नरहर ऊर्फ काकासाहेब गाडगीळ हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर मोहन धारिया, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, प्रकाश जावडेकर (राज्यसभा सदस्य) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर भाजपकडून पहिल्यांदाच लोकसभेला निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा आज (ता. 09 जून) सायंकाळी दिल्लीत शपथविधी होत आहे. मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. ते माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी करतील. दरम्यान, मोदी यांच्या मंत्रिमंडळात सुमारे ४० खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांना संधी देण्यात आलेली आहे. यातील मोहोळ सोडता दोनपेक्षा जास्त वेळा खासदार आलेले आहेत. मुरलीधर मोहोळ हे पुण्यातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश विशेष मानला जात आहे.

पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे नरहर ऊर्फ काकासाहेब विष्णू गाडगीळ (KakaSaheb Gadgil) यांना स्थान मिळाले होते. त्या वेळी त्यांच्याकडे ऊर्जा मंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. ते नेहरूंच्या मंत्रिमंडळात 15 ऑगस्ट 1947 ते 12 डिसेंबर 1950 पर्यंत मंत्री होते. काकासाहेब गाडगीळ पुढे पंजाबचे राज्यपालही झाले.

Punekar Union Minister
Modi Government 3.0 : मुरलीधर मोहोळ पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गजांच्या लिस्टमध्ये!

काकासाहेब गाडगीळ यांच्यानंतर ॲड मोहन धारिया (Mohan Dharia) यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. धारिया हे 1971-1977 या कालावधीत पुण्याचे खासदार होते. तत्पूर्वी ते 1964 ते 1970 पर्यंत राज्यसभा सदस्य होते. धारिया हे 1971 ते 1974 च्या दरम्यान काँग्रेस सरकारमध्ये नियोजन विभागाचे, तर 1974 ते 1975 गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते. पुढे ते मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्य विभागाचे मंत्री बनले होते.

मोहन धारिया यांच्यानंतर काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ (Vitthalrao Gadgil) यांनी पुण्याचे खासदार म्हणून केंद्रीय मंंत्रिमंडळात काम केले. ते 1980 ते 1989 पर्यंत खासदार होते. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण उत्पादन मंत्री, तर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि नभोवणी मंत्री म्हणून काम केले होते.

Punekar Union Minister
Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळांचे मंत्रिपद ठरले! केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रिपदी वर्णी?

विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यातून निवडून आलेले सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) हे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात 1995-1996 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री हेाते. कलमाडी यांच्यानंतर पुण्याचे मात्र राज्यसभा सदस्य असलेले प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) हे मोदी सरकारच्या काळात मंत्री होते.

सुरेश कलमाडी यांच्यानंतर थेट जनतेतून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. पुण्याचे महापौर म्हणून काम केलेले मुरलीधर मोहोळ हे लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांना मोदी सरकार 3.0 मध्ये थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

Punekar Union Minister
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार किशोर दराडेंचे अपहरण की बेपत्ता?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com